भाग-१
पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा मानल्या जायच्या, याच गरजामध्ये आता मोबइल(स्मार्टफोन्स्), इंटरनेट, बाईक/कार यांचा समावेश होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर ब्रॅन्डेड, लक्झुरियस बाईक/कार सर्रास दिसतात. या वाहनांमुळे जिकडे तिकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक होते. ट्रॅफिक कितीही असले तरी काही मनमोहक कार नक्कीच आपले लक्ष वेधून घेतात. अशा कार फक्त लक्षच वेधुन घेत नाहीत तर एखाद्याचे प्राणही हिरावून घेतात.

मला लहानपणीपासून मांजर आणि कुत्री (फक्त पिल्लु) खूप आवडतात, त्यादिवशी झालं असं, मी बसस्टॉपवर बसची वाट पहात थांबले होते. एक छोटसं पपी अहो कुत्र्याच पिल्लु हो! अस 'क्युट'सं, काळ कुळकुळीत! ते असं लुटूलुटू रस्ता पार करत होतं. त्याच वेळी समोरुन एक मनमोहक कार येत होती. पपी ची दिरंगाई आणि ड्रायव्हर ची घाई या दोहोंचा मेळ बसला नाही आणि क्षणार्धात पिल्लु चा निष्प्राण देह समोर दिसला. कार तर केव्हाच हवेच्या वेगाने पसार झाली, मागे वळूनही न पाहता...
अशा वेळी मनात विचार येतो, ते पिल्लु एवढुसं छोटुसं असला म्हणून काय झाल. जर त्या पिल्लु च्या जागेवर एखादा मनुष्य प्राणी असता तर लगेच लोक जमा झाले असते. पोलिस कम्प्लेन्ट केली असती आणि बरच काही.. तो पपी एक छोटासा प्राणी म्हणून त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.
भाग- २
केदारनाथला गेलेल्या भाविकांची झालेली दशा आणि त्या महाकाय संकटातून सहीसलामत परत आलेल्या नागरिकांचे अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया आपण वृत्तपत्रे आणि विविध वाहिन्यांच्या माध्यमातून पाहिल्या. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अशाच दोन कुटुंबियांना भेटण्याचा नुकताच् योग आला. एका डोळ्यातून आपल्या माणसांना भेटल्याचा आनंद तर दुसर्य़ा डोळ्यातून त्या कठिण प्रसंगात यमदुत समोर दिसत असताना इथून परत घरी जाऊ की नाही अशी अवस्था, असा दुहेरी मिलाप त्या पती-पत्नीच्या अश्रुंद्वारे दिसून येत होता. त्यांनी सांगीतलेल्या अनुभवामध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे; त्या संकटात ही मंडळी अडकली असताना तेथील नागरिकांनी यांना मदत करण्यऐवजी स्वःतचा फायदा करुन घेत होती. अतिववृष्टी मध्ये पावसापासुन आसरा देण्यासाठी यात्रेकरुंकडून पैसे हिसकावून घेत होती. काही लोक पैसे न दिल्यास त्यांना खाली ढकलून देत होती. भारताची संस्कृती आहे 'अतिथी देवो भवः'! दुसर्या राज्यातून आलेल्या भाविकांचि मदत करण्यऐवजी त्यांनाच लुटले जात होते. कुठे गेली माणसाची माणुसकी? जवानांच्या मदतीने ही मंडळी सहीसलामत घरी आली परंतु बाकी लोकांचे काय?
अशा वेळी म्हणावसं वाटतं
देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!
सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!!
***
No comments:
Post a Comment