Thursday, 23 July 2026

Andharban Jungle Trek : पावसाळी भटकंतीची पर्वणी: कुंडलिका व्हॅली आणि खळखळत्या धबधब्यांचे माहेरघर 'अंधारबन'

पुण्याजवळील हिडन जेम अंधारबन जंगल ट्रेकसाठी ऑनलाईन पास कसा बुक कराल? प्रवेश शुल्क, नियम, वेळापत्रक आणि पोहोचण्याचा मार्ग जाणून घ्या – संपूर्ण मराठी गाईड, आत्ताच वाचा!

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात वसलेला अंधारबन जंगल ट्रेक हा राज्यभरातील ट्रेकर्समध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला आणि लोकप्रिय ट्रेक आहे. पावसाळा सुरू होताच निसर्गप्रेमींची पावले या घनदाट, रहस्यमय जंगलाकडे आपोआप वळतात. मात्र वाढत्या गर्दीमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन वन विभागाने स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने एक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पर्यटन आराखडा तयार केला आहे. आज हा आराखडा राज्यातील इतर पर्यटनस्थळांसाठी एक आदर्श मॉडेल आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

अंधारबन जंगलाचे नेत्रदीपक नैसर्गिक सौंदर्य

'अंधारबन' हे नाव सार्थ ठरवणारे हे जंगल इतके घनदाट आहे की काही ठिकाणी सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाही — म्हणूनच हा महाराष्ट्रातील सर्वात युनिक आणि मस्ट-व्हिजिट ट्रेक मानला जातो. ट्रेकदरम्यान कुंडलिका व्हॅलीचे विहंगम आणि थक्क करणारे दृश्य, खळखळणारे धबधबे आणि समृद्ध जैवविविधता अनुभवायला मिळते.

पिंपरी गावापासून सुरू होणारा हा उतारवजा मार्ग भिरा धरणाजवळ संपतो. साधारण १०-१२ किमीचा हा रोमांचकारी प्रवास पूर्ण करण्यासाठी ४ ते ५ तास लागतात. मार्ग उतारवजा असल्याने नवशिक्या ट्रेकर्ससाठीही तो तुलनेने सोपा आणि फॅमिली-फ्रेंडली मानला जातो.

अंधारबन ट्रेकचे महत्त्वाचे नियम — न चुकवण्यासारखी माहिती

गर्दीचे नियोजन आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने खालील कडक नियम लागू केले आहेत:

  • ऑनलाईन परवानगी सक्तीची – जंगलात प्रवेशासाठी वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आगाऊ पास काढणे बंधनकारक आहे. दररोज मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश दिला जातो.
  • स्थानिक गाईड अनिवार्य – घनदाट जंगलात वाट चुकण्याची शक्यता असल्याने प्रत्येक गटासोबत स्थानिक गाईड असणे बंधनकारक आहे. यातून सुरक्षा वाढते आणि स्थानिक तरुणांना रोजगारही मिळतो.
  • मद्यपान व प्लास्टिकबंदी – जंगल परिसरात मद्यपान, हुक्का किंवा प्लास्टिक कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. नियमभंग केल्यास दंड आकारला जातो.
  • वेळेचे बंधन – सुरक्षेच्या दृष्टीने पहाटे लवकर ट्रेक सुरू करून दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत जंगलाबाहेर पडणे अपेक्षित आहे.

अंधारबन ट्रेकसाठी ऑनलाईन पास कसा बुक कराल? — स्टेप बाय स्टेप गाईड

अंधारबन ट्रेकसाठी प्रवेशद्वारावर ऑफलाइन तिकीट मिळत नाही — पास आधीच ऑनलाईन बुक करणे बंधनकारक आहे. बुकिंगची अगदी सोपी आणि झटपट प्रक्रिया:

  1. अधिकृत Andharban Trek Booking पोर्टलला भेट द्या.
  2. मुख्य पानावरील 'Book Ticket Now' पर्यायावर क्लिक करा.
  3. ट्रेकची तारीख आणि सोबतच्या ट्रेकर्सची संख्या निवडा.
  4. सर्व सहभागींचे नाव, वय, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डसारखे ओळखपत्र क्रमांक अचूक भरा.
  5. UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन शुल्क भरा.
  6. बुकिंग पावती मोबाईलमध्ये डाउनलोड करा किंवा प्रिंट काढून सोबत ठेवा.

प्रवेश शुल्क (Ticket Price):

  • भारतीय नागरिक: प्रति व्यक्ती ₹१४०
  • परदेशी नागरिक: प्रति व्यक्ती ₹२८०
  • कॅमेरा शुल्क (ऐच्छिक): भारतीयांसाठी ₹१९५, परदेशी नागरिकांसाठी ₹३९०

एकाच पावतीवर अंधारबन ट्रेक तसेच कुंडलिका व्हॅली या दोन्ही ठिकाणी प्रवेश मिळतो — म्हणजे दुहेरी फायदा!

बुकिंगपूर्वी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या आणि उपयुक्त बाबी

  • जंगलाच्या संरक्षणासाठी दररोज केवळ ७०० पर्यटकांनाच प्रवेश दिला जातो — शनिवार-रविवारसाठी सीट्स झटपट फुल होतात, त्यामुळे आधीच बुकिंग करणे उचित.
  • ट्रेकच्या आदल्या रात्री बारा वाजता त्या दिवसाचे बुकिंग बंद होते — ऐनवेळी जागेवर पास मिळत नाही.
  • सुरक्षेच्या कारणास्तव केवळ १६ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनाच प्रवेश — लहान मुलांना परवानगी नाही.
  • अंधारबनच्या प्रवेशद्वाराजवळ मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते — घरातूनच बुकिंग पावतीचा स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये जतन करा, अन्यथा प्रवेशाला अडचण येऊ शकते.
  • बुकिंगसाठी वापरलेल्या आधार कार्ड/ओळखपत्राची मूळ प्रत सोबत बाळगणे आवश्यक, कारण प्रवेशद्वारावर काटेकोर पडताळणी होते.

अंधारबनला कसे पोहोचाल? — संपूर्ण मार्गदर्शन

  • पुण्याहून: पौड-मुळशी मार्गे ताम्हिणी घाटातील पिंपरी गावापर्यंत सुमारे ६५-७० किमी प्रवास.
  • मुंबईहून: लोणावळा-पेण किंवा खालापूर-पाली मार्गे ताम्हिणी घाटात सहज पोहोचता येते.

का आहे अंधारबन तुमच्या बकेट लिस्टमधील टॉप चॉईस?

अंधारबन ट्रेक हा निसर्गाचा एक विलोभनीय आणि अविस्मरणीय आविष्कार आहे. वन विभागाने राबवलेली शिस्तबद्ध नियमावली दाखवून देते की योग्य नियोजन केल्यास पर्यटन आणि पर्यावरण रक्षण हातात हात घालून पुढे जाऊ शकतात. या पावसाळ्यात अंधारबनला भेट देण्याचा विचार करणाऱ्यांनी वरील सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून हा एक्सपिरियन्स सुरक्षित, रोमांचक आणि कायम लक्षात राहील असा ठरेल. वेळ न दवडता आजच तुमचा पास बुक करा आणि निसर्गाच्या या अद्भुत खजिन्याचा आनंद लुटा!

#AndharbanTrek #ताम्हिणीघाट #PuneTrekking #HiddenGem #MonsoonTrek

#अंधारबन_ट्रेक, #Andharban_Trek_booking, #अंधारबन_जंगल_ट्रेक, #ताम्हिणी_घाट_ट्रेक, #पुणे_ट्रेकिंग_स्पॉट, #अंधारबन_ऑनलाईन_पास, #अंधारबन_प्रवेश_शुल्क, #कुंडलिका व्हॅली ट्रेक, #पावसाळी_ट्रेक_पुणे, #मान्सून_ट्रेकिंग_महाराष्ट्र, #अंधारबन_कसे_पोहोचावे, #पिंपरी_गाव_ट्रेक, #भिरा_धरण_ट्रेक, #हिडन_जेम_पुणे, #वीकेंड_गेटवे_पुणे

Tuesday, 7 October 2025

आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद आणण्याचे 7 सोपे रहस्य

आयुष्य कधीच सरळमार्गी नसते. आपण सर्वचजण अशा क्षणांना नेहमी सामोरे जातो जे आपली परीक्षा घेतातजस की नोकरी जाणेनातं तुटणेआरोग्याच्या समस्या किंवा भविष्याबद्दलची अनिश्चितता. अशा वेळी हरल्यासारखंथकून गेल्यासारखं आणि हरवल्यासारखं वाटणं अगदीच स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. पण आयुष्यात सकारात्मक राहणं म्हणजे सगळं ठीक असल्याचं भासवणं नाही तर कठीण काळातही आशाधैर्य आणि शांतता शोधणं हे आहे. कठीण काळात आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी काही सकारात्मक गोष्टी आपण अमलात आणू शकतो जसे की ..

1. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्या स्वीकारणे  

कोणत्याही गोष्टीत शांततेकडे जाण्याचे पहिले  पाऊल म्हणजे स्वीकारआनंदी जीवन जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक परिस्थितिचा आनंदाने स्वीकार करणे. जेव्हा आपण नियंत्रणात नसलेल्या गोष्टींशी लढणं थांबवतोतेव्हा आपण आपली ऊर्जा त्या गोष्टींवर केंद्रित करू शकतो जे आपण बदलू शकतो. जॉर्ज ऑरवेल म्हणतात “आनंद फक्त स्वीकारामध्येच अस्तित्वात असतो.” 

हे माझ्याच बाबतीत का घडलं?” असं विचारण्याऐवजी, “मी यातून काय शिकू शकतो?” असं विचारा. या छोट्याशा विचारातील बदलामुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे नक्कीच बदलू शकतो.   

2. मन मोकळं करायला शिका

भावना दाबून ठेवणं मनुष्याला नेहमी अधिक जड बनवतं. आपल्या भावना विश्वासू व्यक्तीशीजीवनसाथीएखादा जवळचा मित्र-मैत्रीणआई-वडीलभाऊ-बहीण यांच्या सोबत बोलून मन मोकळं करू शकता. यामुळे मनावरील ओझं नक्कीच हलकं होईल. मन मोकळं करणं म्हणजे आपल्या भावनांना शब्द देणं आणि ते योग्य व्यक्तीसमोर करणं खूप गरजेचं असतं.

जर आपल्याला बोलायला मन मोकळ करायला कोणीच नसेल तर आपण आरशासमोर स्वतःशी बोलून मन मोकळ करू शकतो. जर तसेही करू शकलो नाही तर एक डायरी घेऊन त्यात लिहिल्याने मन हलकं होईल आणि विचार अधिक स्पष्ट होतीलकधी कधी आपल्या सारख्याच अनुभवातून गेलेल्या लोकांशी बोलणंही मदत करतं. त्यांनी जे अनुभवलं आहे तेच लोक आपल दु:ख समजू शकतात. तज्ज्ञ व्यक्तीईश्वरगुरुनिसर्गप्रार्थनाध्यान या गोष्टी देखील मदत करू शकतात. आपल्या संघर्षांविषयी बोलणं आपल्याला  कमजोर बनवत नाहीतर ते आपल्याला मानवी बनवतं.

 3.  वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा

आपण भूतकाळ आठवून किंवा भविष्याची भीती बाळगूनच जास्त चिंताग्रस्त होतो. Mindfulness म्हणजे फक्त आत्ता या क्षणात राहणं,  हे मन शांत ठेवण्यास मदत करतं.

एक साधा उपाय करून पाहा: एक दीर्घ श्वास घ्या. आजूबाजूच्या आवाजांकडेरंगांकडेसुगंधांकडे लक्ष द्या. स्वतःला आठवा “मी आत्ता सुरक्षित आहे.” दररोज काही मिनिटे अशी जाणीवपूर्वक विश्रांती घेतली तरी मनात स्पष्टता आणि शांती निर्माण होते.

4.  नेहमी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी/कृतज्ञ राहणं  

दररोज कृतज्ञतेचा सराव केल्याने ताण कमी होतोमन शांत राहतं आणि आयुष्यात समाधान वाढतं. कृतज्ञता म्हणजे काहीतरी मिळालं म्हणून आनंदी होणं नाहीतर आनंदी असल्यामुळे मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी राहणं आहे. दररोज काही क्षण मनापासून धन्यवाद म्हणा. स्वतःलाजीवनालाआणि त्या छोट्या क्षणांना जे तुम्हाला नेहमी आनंदी बनवत. असे केल्याने जीवन हळूहळू अधिक सुंदर वाटू लागेल. आभार मानल्याने  तुमचं लक्ष काय नाही यावरून काय आहे याकडे वळवते.

दररोज तीन छोट्या गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात जसं एखादं प्रेमळ शब्दसुंदर सूर्यास्तगरम चहाचा कपकुणी मदत केलीहसवलंअमूल्य  वेळ दिला. दिवसाच्या शेवटी डोळे बंद करा आणि विचार करा  “आज मला काय मिळालं?” त्यांना मनापासून धन्यवाद द्या.

5.  मनात सकारात्मकता भरा

आपण काय ऐकतोपाहतो आणि वाचतो त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. प्रेरणादायी पॉडकास्ट ऐका. जेवढी चांगली पुस्तके मिळतील तेवढी वाचा. भीती किंवा नकारात्मकता पसरवणाऱ्यांऐवजी सकारात्मक विचार पसरवणाऱ्यांना फॉलो करा. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीकडे स्वतःला उभारी देणाऱ्या वातावरणात ठेवायला शिका.

 6.  नेहमी स्वतःची काळजी घ्या

आयुष्यात आपल्या सगळ्यात जवळची आणि महत्वाची व्यक्ति कोणी असेल तर ती म्हणजे आपण स्वत: आणि कठीण काळात self-care म्हणजे स्वार्थीपणा नसून ती गरज असते.

पुरेशी झोप घ्या. पौष्टिक अन्न खा. थोडं चालायला जा किंवा हलका व्यायाम करा. अपराधी वाटू न देता विश्रांती घ्या.जेव्हा शरीर चांगलं वाटतंतेव्हा मनाला लढण्याची ताकद मिळते.

7.  हे ही दिवस निघून जातील यावर विश्वास ठेवा

कोणतेही वादळ कायमस्वरूपी राहत नाही. प्रत्येक कठीण काळानंतर प्रकाश येतच असतो. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक कठीण दिवसातून बाहेर पडलात हेच तुमच्या शक्तीचा पुरावा  आहे. म्हणूनथोडं थांबा विश्वास ठेवा आणि स्वतःला आठवा हा क्षण तात्पुरता आहेपण तुमचं धैर्य कायमचं आहे.

कठीण काळात सकारात्मक राहणं म्हणजे वेदना नाकारणं नाही तर वेदनेच्या मधेही आशा निवडणं आहे. जीवन परिपूर्ण नसतंपण तरीही त्यात हसण्याची हजारो कारणं असतात.

 

#कृतज्ञता #सकारात्मकविचार #आनंद #मनशांती #MotivationMarathi #LifeLessons #SelfGrowth #कृतज्ञतेचासराव #positive_thinking #marathi, #आनंद #gratitude #आनंदी_जीवनाचे_रहस्य #happiness_tips #मानसिक_शांतीचे_रहस्य #self_improvement  

 

 


Sunday, 7 March 2021

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहाणी झाली जी ती पूर्वीही होती आणि आजही आहे ... आत्त्ता फक्त फरक एवढाच आहे सगळे बंधन तोडून नव्हे तर ते सगळे सांभाळून सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेस.... रोज एक नव्हे आव्हान आहेच .. आई, बहीण, काकू, मावशी, मैत्रीण .. सर्वच नाती सांभाळत स्वतःकडे किती लक्ष देते ? .. संकटं कितीही येवो तरी सगळ्यांचा पाठीशी खंबीरपणे राहणारी तू ... प्रत्येक क्षणात ना डगमगता सगळ्यांना सावरून घेणारी तू ... कोणी तुला हे सांगू अथवा नको सांगू ... तू आजही कणखर आहेस कालही होती आणि उद्याही राहणार... रोजचाच दिवस आपला आहे 😜 तरीसुद्धा आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐 🥳🥳💃💃

#womansday #जागतिकमहिलादिन

Monday, 1 June 2020

Smile ! Its free therapy ... :)

Have you ever realized or felt that we are living two lives? One is that everybody sees. Where everybody compares their life with yours and thinks yours is so awesome, exciting, and adventurous. You are having so much fun. You have achieved everything, and you are happy with your life... Bole to life ekdum set. 
And there is a second one where nobody knows what you are feeling deep inside your heart. There is so much pain that you can't share it with anybody because nobody understands. You wanted to share it with somebody, but no! You don't want to hurt anybody, so you keep that thing deep inside. And day by day, you got used to it. And staying happy or smiling all the time becomes your habit. Still in your heart, you are juggling these two lives, and nobody will understand it. 

Monday, 23 March 2020

Me Time


कामाच्या व्यापामध्ये आपण स्वतःला किती अडकवून घेतो ना ...खुप दिवसांनी ब्लॉग लिहायचा मूड आलाय... विषय खूप असतात, विचार हि खूप येतात डोक्यात... पण तो मांडायला वेळ नसतो(जो असतो खूप...  पण आपण कधी काढत नाही :P) सो ... सध्या वेळ खूप आहे...  घरात बसून करायचं काय??? बाहेर पडता येत नाही, कोणाला भेटता येत नाही......  वर्षभरानंतर मी काल माझ्या एका जुन्या मैत्रिणीला भेटले. तिनेही स्वतःला कामात  खूप अडकून घेतलेल ... म्हणजे श्वास घ्यायलाहि वेळ नाही अगदी तसं ... फायनली आम्हाला भेटायला वेळ मिळाला आणि आम्ही भेटलो. एवढ्या कालावधीने भेटल्यानंतर वेळेचं भान नसतं ... इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर मी तिला विचारलं

मी : तू एवढी का बीजी झालीये तुला वेळच नसतो ??? ना बोलायला ना भेटायला ... 
ती : वेळ काढून करू काय ??? 
मी : अगं ... दिवसभरात कितीही बिझी असलं तरी स्वतःसाठी वेळ (ME  TIME )काढायला पाहिजे ना 
ती : आणि त्या मी टाईम मध्ये काय करायचं ??? 
मी : स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या :)
ती : म्हणजे नक्की काय ??? मी जेव्हा माझं काम करते तेच माझ्यासाठी मी टाईम असतो 
मी : या 'मी टाईम' मध्ये तुम्ही या गोष्टी करू शकता

झोप काढा - झोप तर आपण रोजच काढतो, पण कधी स्वतःला रिलॅक्स केल आहे का? ? कामाच्या व्यापामध्ये रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं या रुटीन लाईफ मध्ये झोपेकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा विकेंड येतो तेव्हा बराचसा वेळ आठवड्याची पेंडिंग काम संपवण्यात जातात. तर या मी टाइम मध्ये छानशी झोप काढू शकता आणि ताण तणावापासून मुक्ती मिळवू शकता. 

स्वतःला पॅम्पर करा : यासाठी घराबाहेर पार्लरलाच जायला पाहिजे असं काही नाही. छानपैकी स्वतःला हेड मसाज देऊ शकता, नेल आर्ट करू शकता, मेकअप करू शकता, विंग आय लायनरची प्रॅक्टिस करू शकता :P (बिग टास्क), आपल्याकडे असणाऱ्या ज्वेलरीस चे कलेक्शन स्वतःवर ट्राय करू शकता, एखादी हटके हेअर स्टाईल करून बघायची. एखादे युट्युब मेकअप ट्यूटोरील स्वतः करून बघायचे आणि सगळ्यात महत्वाचे स्वतःवर प्रेम करायचे <3
                                 . 

स्वत:चे फोटो काढा - बऱ्याचदा लोकांची ओरड असते माझे फोटोज चांगले नाही येत, तु किती फोटोजेनिक आहेस, तुझे फोटो नेहमी चांगले येतात. माझे पण फोटो काढत जा ना असे. कधी स्वत:ला टाईम दिलाय का ?? आपले फोटो छान कसे येतील याचा विचार केला का ? स्मार्टफोन तर सगळ्यांकडे आहेत मग स्वतःचे किती फोटो काढता ? 

आपला छंद जोपासा - आपल्या प्रत्येकाला एकतरी छंद असतो, गाणी ऐकणे, डिझाईन्स/डूडल्स/ कॅलिग्राफी/पेंटिंग/ स्केचिंग, काहींना जिम ला जाऊन वेळ घालवायला आवडते, एखादं वाद्य वाजवायला शिकावे, फोटोग्राफी, मनातले विचार डायरी मध्ये लिहा, बागकाम करा, पुस्तक वाचा, डान्स करा, घ्या एखादा तरी छंद लावून, कुठेतरी आतमध्ये दडलेला असेल काढा त्याला बाहेर. छंदातून मिळणारा आनंद दुसरा कोणी देऊ नाही शकत. 



प्रत्येकाला दिवसाला २४ तास मिळतात आणि त्या २४ तासातले आपण फक्त स्वतःसाठी किती वेळ देतो ?? मग ते पाच मिनिट असो अथवा पाच तास. यावरूनच कळते आपण स्वतःवर किती प्रेम करतो. दुसऱ्यावर तर कोणीही प्रेम करेल आधी स्वतःवर प्रेम करा बाकीचे आपोआप तुमच्यावर प्रेम करतील.

 मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी या आणि अजूनही बाकी काही गोष्टी करत असते ज्या यामध्ये टाकलेल्या नाही. या फक्त घरात बसून करण्यासारख्या आहेत. बाकी बाहेर पडून तर स्वतःसाठी अजून हि बरंच काही करू शकतो. तुम्ही काय करता तुमच्या 'मी टाईम ' मध्ये??? का फक्त बोर होत बसता ?? आणि कामाच्या वेळी म्हणता .. मला वेळ मिळाला असता तर मी हे केलं असतं  मी ते केलं असतं ??? अजून काही आयडियास असतील तर कमेंट मध्ये टाकू शकता :) हॅप्पी 'मी टाईम' :




Thursday, 19 March 2020

#sunkissed

... सकाळी सकाळी ऊन्हात बसण्याची मजा काही औरच असते .. सध्या असलं काही होत नाही.. सकाळी लवकर उठा... पटापट आवरा.. डबा करा डबा भरा .. ऑफिस ला जा.. एसी मध्ये बसा ... जमलं तर लंच ल बाहेर पडा... तेवढ्या कालावधीत जेवढं काही ऊन मिळेल तेच काहीस... बाकी ऊन्हाशी आपला जास्त काही संबंध येत नाही ... पण हे सकाळचं ऊन मस्तच असतं .. असं भारी वाटतं .. .. गॅलरी मध्ये आपल्या झोक्यावर बसायचं आणि चहा/कॉफी सोबत छानपैकी एखादं पुस्तक वाचायला घ्यायचं... किंवा मस्तपैकी गुलजार ची गाणी लावून ऐकत बसायचं.. झालं ना मग अशी सकाळ कोणाला नकोय ... सुट्टीच्या दिवशी सकाळी लोळत बसण्यापेक्षा असलं काहीतरी भारी वाटतं... आणि ते #sunkissed वगैरे वगैरे

Sunday, 29 December 2019

''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' - The Power Game



खूप दिवसांपासून अमृता-प्रभाकर चे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक पाहायचे होते पण वेळ मिळत नाही, दूर आहे, पुढच्या वेळी येते अशी वेगवेगळी कारण देत आज तो योग आला. आपल्या मित्र-मैत्रिणींना पहिल्यांदाच रंगमंचावर अभिनय करताना बघतानाचा आनंद काही वेगळाच असतो. आवाज, वेशभूषा, अभिनय, सगळंच भारावून टाकणारं. निशाला आपलं प्यादं बनवून हवं तसं नाचवता येण्यासाठी, आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी तिचा हवा तसा शारीरिक आणि मानसिक उपभोग घेण्यासाठी मुग्धाची खेळी म्हणजेच  ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक म्हणजे लहानपणापासून वेश्यावस्तीत वाढलेला रघु(प्रभाकर पवार), गावाकडून आलेली, आयटी विभागात काम करत गावाकडचं कुटुंब सांभाळणारी निशा(सुजाता कांबळे) आणि वकिली क्षेत्रात आपला ठसा उमठवलेली आपल्याला हवं ते आणि तेही कुठल्याही परिस्थितीत मिळवणारी 'पॉवर वुमन' मुग्धाची(अमृता ओंबळे ) कहाणी.  वेश्यावस्तीत वाढल्यामुळे तिथल्या समस्या, तिथल्या महिलांचे होणारे शारीरिक शोषण रघु जवळून पाहत आल्याने तिथल्या जास्तीत जास्त महिलांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून तो धडपडतो आहे. दुसरीकडे निशा जी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या हेतूने आपले गावचे घर सोडून शहरात आली आहे.  पैसे कमावण्याच्या नादात ती समलैंगिक वासनेच्या  वेगळ्याच भोवरयात सापडली आहे. रघूच्या येण्याने आपल्यावर होत असलेला समलैंगिक छळ आणि त्यातून रघुवरील प्रेम आणि त्याशिवाय आपल्याला कोणी बाहेर काढू शकनार नाही हा आत्मविशास. या प्रेम कहाणी मध्ये एक स्त्री असूनही जिला स्त्री देह उपभोगायची चटक लागलेली आहे आणि जी शेवट पर्यंत पुरुष जातीचा तिरस्कार करत आपल्याकडील पाॅवर्स चा गैरउपयोग करणारी मुग्धा. 


 

हे नाटक प्रत्यक्ष बघण्यात जे थ्रिल आहे ते इथे सांगण्यात नाही. कारण हे नाटक आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असले तरीही आपण या नाटकात अप्रत्यक्षरीत्या जोडले जातो. नाटक संपल्यावर काही गोष्टी आपल्या मेंदूत गुणगुणत राहतात.अतिशय संवेदनशील असा समलैंगिकतेचा विषय हाताळत असतानाच दुसरीकडे सगळेच पुरुष एक सारखे नसतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. निशाची होणारी घुसमट अंगावर येते. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी निशा असतील ज्या अशा शारीरिक छळाच्या शिकार असतील. इच्छा असूनही या गर्तेतून बाहेर पडता येत नाही.  माणूस पॉवर चा उपयोग करून कोणत्याही थराला जाऊ शकतो का ? आपलं सोशल स्टेटस जपण्यासाठी आपण लेस्बियन आहोत हे जगापासून लपवून ठेवतो? आपल्याला हवं तसं जगता येण्यासाठी मग त्यात कोणाचाही बळी गेलेला चालतो ? कुठेतरी विचार करायला लावणारं, काहीतरी खटकतंय, सुन्न करनारं आणि डोक्याला झिणझिण्या आणणारं नाटक म्हणजे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



Andharban Jungle Trek : पावसाळी भटकंतीची पर्वणी: कुंडलिका व्हॅली आणि खळखळत्या धबधब्यांचे माहेरघर 'अंधारबन'

पुण्याजवळील हिडन जेम अंधारबन जंगल ट्रेकसाठी ऑनलाईन पास कसा बुक कराल? प्रवेश शुल्क, नियम, वेळापत्रक आणि पोहोचण्याचा मार्ग जाणून घ्या – संपूर्...