मी : तू एवढी का बीजी झालीये तुला वेळच नसतो ??? ना बोलायला ना भेटायला ...
ती : वेळ काढून करू काय ???
मी : अगं ... दिवसभरात कितीही बिझी असलं तरी स्वतःसाठी वेळ (ME TIME )काढायला पाहिजे ना
ती : आणि त्या मी टाईम मध्ये काय करायचं ???
मी : स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या :)
ती : म्हणजे नक्की काय ??? मी जेव्हा माझं काम करते तेच माझ्यासाठी मी टाईम असतो
मी : या 'मी टाईम' मध्ये तुम्ही या गोष्टी करू शकता
झोप काढा - झोप तर आपण रोजच काढतो, पण कधी स्वतःला रिलॅक्स केल आहे का? ? कामाच्या व्यापामध्ये रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं या रुटीन लाईफ मध्ये झोपेकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा विकेंड येतो तेव्हा बराचसा वेळ आठवड्याची पेंडिंग काम संपवण्यात जातात. तर या मी टाइम मध्ये छानशी झोप काढू शकता आणि ताण तणावापासून मुक्ती मिळवू शकता.
स्वतःला पॅम्पर करा : यासाठी घराबाहेर पार्लरलाच जायला पाहिजे असं काही नाही. छानपैकी स्वतःला हेड मसाज देऊ शकता, नेल आर्ट करू शकता, मेकअप करू शकता, विंग आय लायनरची प्रॅक्टिस करू शकता :P (बिग टास्क), आपल्याकडे असणाऱ्या ज्वेलरीस चे कलेक्शन स्वतःवर ट्राय करू शकता, एखादी हटके हेअर स्टाईल करून बघायची. एखादे युट्युब मेकअप ट्यूटोरील स्वतः करून बघायचे आणि सगळ्यात महत्वाचे स्वतःवर प्रेम करायचे <3
.
.
स्वत:चे फोटो काढा - बऱ्याचदा लोकांची ओरड असते माझे फोटोज चांगले नाही येत, तु किती फोटोजेनिक आहेस, तुझे फोटो नेहमी चांगले येतात. माझे पण फोटो काढत जा ना असे. कधी स्वत:ला टाईम दिलाय का ?? आपले फोटो छान कसे येतील याचा विचार केला का ? स्मार्टफोन तर सगळ्यांकडे आहेत मग स्वतःचे किती फोटो काढता ?
आपला छंद जोपासा - आपल्या प्रत्येकाला एकतरी छंद असतो, गाणी ऐकणे, डिझाईन्स/डूडल्स/ कॅलिग्राफी/पेंटिंग/ स्केचिंग, काहींना जिम ला जाऊन वेळ घालवायला आवडते, एखादं वाद्य वाजवायला शिकावे, फोटोग्राफी, मनातले विचार डायरी मध्ये लिहा, बागकाम करा, पुस्तक वाचा, डान्स करा, घ्या एखादा तरी छंद लावून, कुठेतरी आतमध्ये दडलेला असेल काढा त्याला बाहेर. छंदातून मिळणारा आनंद दुसरा कोणी देऊ नाही शकत.
प्रत्येकाला दिवसाला २४ तास मिळतात आणि त्या २४ तासातले आपण फक्त स्वतःसाठी किती वेळ देतो ?? मग ते पाच मिनिट असो अथवा पाच तास. यावरूनच कळते आपण स्वतःवर किती प्रेम करतो. दुसऱ्यावर तर कोणीही प्रेम करेल आधी स्वतःवर प्रेम करा बाकीचे आपोआप तुमच्यावर प्रेम करतील.
मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी या आणि अजूनही बाकी काही गोष्टी करत असते ज्या यामध्ये टाकलेल्या नाही. या फक्त घरात बसून करण्यासारख्या आहेत. बाकी बाहेर पडून तर स्वतःसाठी अजून हि बरंच काही करू शकतो. तुम्ही काय करता तुमच्या 'मी टाईम ' मध्ये??? का फक्त बोर होत बसता ?? आणि कामाच्या वेळी म्हणता .. मला वेळ मिळाला असता तर मी हे केलं असतं मी ते केलं असतं ??? अजून काही आयडियास असतील तर कमेंट मध्ये टाकू शकता :) हॅप्पी 'मी टाईम' :
मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी या आणि अजूनही बाकी काही गोष्टी करत असते ज्या यामध्ये टाकलेल्या नाही. या फक्त घरात बसून करण्यासारख्या आहेत. बाकी बाहेर पडून तर स्वतःसाठी अजून हि बरंच काही करू शकतो. तुम्ही काय करता तुमच्या 'मी टाईम ' मध्ये??? का फक्त बोर होत बसता ?? आणि कामाच्या वेळी म्हणता .. मला वेळ मिळाला असता तर मी हे केलं असतं मी ते केलं असतं ??? अजून काही आयडियास असतील तर कमेंट मध्ये टाकू शकता :) हॅप्पी 'मी टाईम' :
No comments:
Post a Comment