संसार गाडा !!! एकट्याचा कि
दोघांचा ?? मी रोज एकटीनेच ओढायचा का?? तू सकाळी उठणार राजेशाही थाटाने ... मी आपली सकाळी 5 लाच उठलेली ...
मुलांचं सगळं आवरा आवरी करा ... त्यांच्या उठण्या पासून ते आंघोळी, नाष्टा, शाळेचा
डबा ते त्यांना रिक्षात बसू पर्यंत सगळंच करा... तू आपलं आरामात उठणार ... चहा दे गं ... मग तो पेपर हातात घेत ...
वाचतो कि नुसतच बघतो .. तुझं तुलाच माहित
.... तासभर ते पेपर-चहा प्रकरण झालं कि ... तुझ्या अंघोळीसाठी पाणी पण मीच काढून
द्यायच ... तुझं शर्ट इस्त्री करूनही मीच ठेवायचा ... माझी इकडे तारेवरची कसरत
तुला कधी कळलीच नाही ...तुझ्यासाठी डब्बा करा तो हि मीच भरून द्यायचा ... तू
आरामात तुझं आवरणार... डब्बा उचलणार .. गाडी ला किक मारून गेला ऑफिसला ... माझ्या
ऑफिस च काय ??? मीही नोकरी करतेच ना... तू
गेल्यावर मी माझा सगळं आवरून हाताला लागेल तो ड्रेस घालून बाहेर पडणार ... दिवसभर
ऑफिस च काम ... त्यातही डोक्यात विचार .. संध्याकाळी भाजी काय करायची ?? ..
पोरांच्या डब्ब्याला उद्या काय करायचा?? .. मधेच कामाच्या डेडलाईन्स ... लंच ब्रेक
मधे ऑफिस च्या मैत्रिणी त्यांचे किस्से सांगणार .. आज सासर्यांनी पोरांना शाळेत
सोडल ... सासूबाई नी हे केला ते केल ... नवऱ्याने हे केल... आपल्याकडे तर तो पण पर्याय
नाही ... ते दोघही गावाकडे ... आपल चौकोनी कुटुंब ... घरात चार टोकाला चार जन ... संध्याकाळी ऑफिसमधून
कधी एकदा निघेल असं विचार करत निघते ... गाडी जसा वेग घेते तस विचारचक्र सुरु ..
जाताना भाजी घ्यायची ... लाईट बिल तुला भरायला सांगितलं होतं ... सिलेंडर बुक करायला
लावला होता तुला ... गेल्यावर मुलांचा अभ्यास ... नानाविध विचार ... घरी पोहचते तर
तू आधीच आलेला ... टीवी आणि तू ... मुलं गेम्स खेळण्यात व्यग्र .... पर्स ठेवून मी
कामाला लागलेली ...तुला दिलेल्या कामाची आठवण करून दिली .. नेहमीप्रमाणे तू विसरलेला
.... जेवण वाढून घ्यायला पण तुझी मदत नाही ... तू आणि टीवी मग्न .... जेवणानंतर
मुलांचा अभ्यासही मीच घ्यायचा .... मग तू आणि मोबाइल ... स्वयंपाकघरातील आवाराआवर
.... तुला बोलायला वेळ नाही माझाशी ... तू झोपून गेलेला.... पुन्हा नेहमीप्रमाणे
दिवसाची सुरुवात आणि पुन्हा तेच चक्रव्यूह ...थोड्याश्या अपेक्षा असतात ... सकाळच्या
कामात थोडीशी मदत ... सगळच नाही पण जमेल ते काम दोघ मिळून करू ... रात्री
स्वयंपाकघरात थोडी मदत ... दिवस कसा गेला एवढा जरी विचारला ना तरी खूप होत रे ...
खूप धावपळ होतीये रे माझी .. एकसाथ 2 मुलांना सांभाळणं आणि त्यात तू एक तिसर्या
मुलासारखं वागतो ... कधीतरी कौतुकाची अपेक्षा मलाही असते ... आपण दोघही एकाच वयाचे .... तुला जसं जगावं वाटत असेल तसं
मलाही वाटत असेल ना???..
लक्ष दे तिच्याकडे ... तुला काय वाटेल या विचारात ती तिला
काय वाटते हे ती कधी व्यक्त होईल कि नाही माहित नाही ...
छान 👍👌
ReplyDelete-आशिष कोकरे