Sunday, 29 December 2019

''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' - The Power Game



खूप दिवसांपासून अमृता-प्रभाकर चे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक पाहायचे होते पण वेळ मिळत नाही, दूर आहे, पुढच्या वेळी येते अशी वेगवेगळी कारण देत आज तो योग आला. आपल्या मित्र-मैत्रिणींना पहिल्यांदाच रंगमंचावर अभिनय करताना बघतानाचा आनंद काही वेगळाच असतो. आवाज, वेशभूषा, अभिनय, सगळंच भारावून टाकणारं. निशाला आपलं प्यादं बनवून हवं तसं नाचवता येण्यासाठी, आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी तिचा हवा तसा शारीरिक आणि मानसिक उपभोग घेण्यासाठी मुग्धाची खेळी म्हणजेच  ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक म्हणजे लहानपणापासून वेश्यावस्तीत वाढलेला रघु(प्रभाकर पवार), गावाकडून आलेली, आयटी विभागात काम करत गावाकडचं कुटुंब सांभाळणारी निशा(सुजाता कांबळे) आणि वकिली क्षेत्रात आपला ठसा उमठवलेली आपल्याला हवं ते आणि तेही कुठल्याही परिस्थितीत मिळवणारी 'पॉवर वुमन' मुग्धाची(अमृता ओंबळे ) कहाणी.  वेश्यावस्तीत वाढल्यामुळे तिथल्या समस्या, तिथल्या महिलांचे होणारे शारीरिक शोषण रघु जवळून पाहत आल्याने तिथल्या जास्तीत जास्त महिलांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून तो धडपडतो आहे. दुसरीकडे निशा जी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या हेतूने आपले गावचे घर सोडून शहरात आली आहे.  पैसे कमावण्याच्या नादात ती समलैंगिक वासनेच्या  वेगळ्याच भोवरयात सापडली आहे. रघूच्या येण्याने आपल्यावर होत असलेला समलैंगिक छळ आणि त्यातून रघुवरील प्रेम आणि त्याशिवाय आपल्याला कोणी बाहेर काढू शकनार नाही हा आत्मविशास. या प्रेम कहाणी मध्ये एक स्त्री असूनही जिला स्त्री देह उपभोगायची चटक लागलेली आहे आणि जी शेवट पर्यंत पुरुष जातीचा तिरस्कार करत आपल्याकडील पाॅवर्स चा गैरउपयोग करणारी मुग्धा. 


 

हे नाटक प्रत्यक्ष बघण्यात जे थ्रिल आहे ते इथे सांगण्यात नाही. कारण हे नाटक आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असले तरीही आपण या नाटकात अप्रत्यक्षरीत्या जोडले जातो. नाटक संपल्यावर काही गोष्टी आपल्या मेंदूत गुणगुणत राहतात.अतिशय संवेदनशील असा समलैंगिकतेचा विषय हाताळत असतानाच दुसरीकडे सगळेच पुरुष एक सारखे नसतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. निशाची होणारी घुसमट अंगावर येते. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी निशा असतील ज्या अशा शारीरिक छळाच्या शिकार असतील. इच्छा असूनही या गर्तेतून बाहेर पडता येत नाही.  माणूस पॉवर चा उपयोग करून कोणत्याही थराला जाऊ शकतो का ? आपलं सोशल स्टेटस जपण्यासाठी आपण लेस्बियन आहोत हे जगापासून लपवून ठेवतो? आपल्याला हवं तसं जगता येण्यासाठी मग त्यात कोणाचाही बळी गेलेला चालतो ? कुठेतरी विचार करायला लावणारं, काहीतरी खटकतंय, सुन्न करनारं आणि डोक्याला झिणझिण्या आणणारं नाटक म्हणजे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



1 comment:

  1. खूपच छान परीक्षण 👍👌
    -आशिष कोकरे

    ReplyDelete

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...