आता काय करावे?
सध्याची पिढी
काही झालं कि लगेच प्रत्येक गोष्टीत 'बोर'/कंटाळा होते. सतत काही ना काही चालू असल्याने काही करायला नसल की
जीव कासविस होतो आणि विचार येतो आता काय कराव.... बर्याच लोकांना हा प्रश्न
सतावतो 'आता
काय करावे?'
जेव्हा हा
प्रश्न डोक्यात येतो तेव्हा लोक साधारणत: पुस्तक वाचतात, पण जेव्हा आपण काही करायला नाही म्हणून पुस्तक वाचायला घेतो
तेव्हा आपण त्या पुस्तकाचा अपमान करतोय, असा नाही वाटत का? आपण कितीही 'बोर' झालो तरी आपल्याकडे कितीतरी असंख्य गोष्टी असतात ज्या आपण
करू शकतो परंतु आपण त्या करत नाही. मला तर असा वाटत 'ज्या
लोकांना काय कराव हा प्रश्न पडतो ती लोक स्वतःवर प्रेमच करत नाही. तुम्ही एखाद्या
व्यक्तिशिवाय किंवा एखाद्या समुहाशिवाय स्वतःसोबत का राहू शकत नाही. तुम्ही स्वत:च स्वत:चा कंटाळा कसा
करू शकता? आपण आपल्या स्वत:ला कसे 'बोर' होऊ शकतो? म्हणजे आपल्यालाच आपली किंमत नाही, असाच त्याचा अर्थ होतो की... जर आपणच आपल्याला किंमत देत
नसू तर लोक कशी देणार? स्वत:च स्वत:ला 'बोर' होण्यसारखे दुर्दैव नाही.
नेहमी
मित्र-मैत्रिणिंचा गराड्यात असल्याने, सतत मोबाईल वर 'चॅट'त बसल्याने आपला स्वत:शी संवादच थांबला आहे आणि आपल्या
डोक्यात काही करायचे असले तरी ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि विचार येतात आता काय
करू? हा प्रश्न पडला की बरेचजण फ्रीज उघडल्यासारखे फेसबुक 'चेक' करतात. तिथे काही दिसले नाही की मग 'रॅंडम' मेसेज पाठवत बसतात. इथेहि 'रिप्लाय' नाही आला की 'बोर' होते. मग पुन्हा सुरू होते... आता काय कराव??
हा
प्रश्न न पडण्यासाठी आपल्याकडे छंद हवेत, नसले तरी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ करायची हौस असावी.
तुम्ही म्हणाल हा काय फाल्तूपणा आहे, इथे जे करायला दिल आहे तेच करायला वेळ नाही आणि म्हणे वेगळा
करायची हौस! जेव्हा अस कधी वाटते ना तेव्हा उठून बस-स्टॅंड रेल्वे स्टेशन ला जायच
असली चित्र विचित्र लोक दिसतात ना.. तिथे नुसतं थांबलं तरी लोक विचारतात 'अमुक ही बस/ रेल्वे कुठे जाते? मला तमक्या ठिकाणी जायचे आहे कसे जाउ?' तिथे कंट्रोलर् असून ही तुम्हाला विचारले जाते. काही लोक
रेल्वे पकडण्याचा मागे लागलेली असतात, कुली सामान घेऊन चाललेला असतो, लोक एकमेकांना टाटा-बाय करत असतात, काही लोक खूप दिवसांनी आपल्या आवडत्या व्यक्तीना भेटलेले असतात. काही भिकारी तिथेच
जागा मिळेल तिथे लवंडलेले असतात. तुमचा वेळ कसा गेला तुम्हालाही नाही कळले आणि आता काय करावे? या प्रश्नाचे उत्तरही मिळाले. अस सगळ्याच ठिकाणी थोड्या अधिक फरकाने सारखच पहायला
मिळत.
निदान
जेव्हा काय करावे?? हा प्रश्न पडतो तेव्हा एखाद्या ठिकाणच निरीक्षण ही एक साधी गोष्ट लक्षात आणली तरी बर्याच गोष्टी विलोभनीय
वाटायला लागतात. चला आता मला काय करायचा हा प्रश्न ''सोल्वड' झाला.
त्यामुळे थोडफार काही लिहून तरी झालं.
आता पुनश्च आता काय करावे?! ☺☺☺