आयुष्य कधीच सरळमार्गी नसते. आपण सर्वचजण अशा क्षणांना नेहमी सामोरे जातो जे आपली परीक्षा घेतात, जस की नोकरी जाणे, नातं तुटणे, आरोग्याच्या समस्या किंवा भविष्याबद्दलची अनिश्चितता. अशा वेळी हरल्यासारखं, थकून गेल्यासारखं आणि हरवल्यासारखं वाटणं अगदीच स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. पण आयुष्यात सकारात्मक राहणं म्हणजे सगळं ठीक असल्याचं भासवणं नाही तर कठीण काळातही आशा, धैर्य आणि शांतता शोधणं हे आहे. कठीण काळात आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी काही सकारात्मक गोष्टी आपण अमलात आणू शकतो जसे की ..
1. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्या स्वीकारणे
कोणत्याही गोष्टीत शांततेकडे जाण्याचे पहिले पाऊल
म्हणजे स्वीकार. आनंदी जीवन जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक परिस्थितिचा आनंदाने
स्वीकार करणे. जेव्हा आपण नियंत्रणात नसलेल्या गोष्टींशी लढणं थांबवतो, तेव्हा आपण आपली ऊर्जा त्या गोष्टींवर केंद्रित करू शकतो जे आपण
बदलू शकतो. जॉर्ज ऑरवेल म्हणतात “आनंद फक्त स्वीकारामध्येच अस्तित्वात असतो.”
“हे माझ्याच बाबतीत का घडलं?” असं विचारण्याऐवजी, “मी यातून काय शिकू शकतो?” असं विचारा. या छोट्याशा विचारातील बदलामुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे नक्कीच बदलू शकतो.
2. मन मोकळं करायला शिका
भावना दाबून ठेवणं मनुष्याला नेहमी अधिक जड बनवतं. आपल्या
भावना विश्वासू व्यक्तीशी, जीवनसाथी, एखादा जवळचा मित्र-मैत्रीण, आई-वडील, भाऊ-बहीण यांच्या सोबत बोलून मन मोकळं करू शकता. यामुळे मनावरील ओझं नक्कीच हलकं होईल. मन मोकळं करणं म्हणजे आपल्या भावनांना शब्द देणं आणि ते
योग्य व्यक्तीसमोर करणं खूप गरजेचं असतं.
जर आपल्याला बोलायला मन मोकळ करायला कोणीच नसेल तर आपण आरशासमोर स्वतःशी बोलून मन मोकळ करू शकतो. जर तसेही करू शकलो नाही तर एक
डायरी घेऊन त्यात लिहिल्याने मन हलकं होईल आणि विचार अधिक स्पष्ट होतील. कधी कधी आपल्या सारख्याच अनुभवातून गेलेल्या लोकांशी
बोलणंही मदत करतं. त्यांनी जे अनुभवलं आहे तेच लोक आपल दु:ख समजू शकतात. तज्ज्ञ व्यक्ती, ईश्वर, गुरु, निसर्ग, प्रार्थना, ध्यान या गोष्टी देखील मदत करू शकतात. आपल्या
संघर्षांविषयी बोलणं आपल्याला कमजोर बनवत नाही, तर ते आपल्याला मानवी बनवतं.
3. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा
आपण भूतकाळ आठवून किंवा भविष्याची भीती बाळगूनच जास्त
चिंताग्रस्त होतो. Mindfulness म्हणजे
फक्त “आत्ता” या क्षणात राहणं, हे मन शांत ठेवण्यास मदत
करतं.
एक साधा उपाय करून पाहा: एक दीर्घ श्वास घ्या. आजूबाजूच्या आवाजांकडे, रंगांकडे, सुगंधांकडे लक्ष द्या. स्वतःला आठवा “मी आत्ता सुरक्षित आहे.” दररोज काही मिनिटे अशी जाणीवपूर्वक विश्रांती घेतली तरी मनात स्पष्टता आणि शांती निर्माण होते.
4. नेहमी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी/कृतज्ञ राहणं
दररोज कृतज्ञतेचा सराव केल्याने ताण कमी होतो, मन शांत राहतं आणि आयुष्यात समाधान वाढतं. कृतज्ञता म्हणजे काहीतरी
मिळालं म्हणून आनंदी होणं नाही, तर आनंदी असल्यामुळे मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी
राहणं आहे. दररोज काही क्षण मनापासून “धन्यवाद” म्हणा. स्वतःला, जीवनाला, आणि त्या छोट्या क्षणांना जे तुम्हाला नेहमी आनंदी बनवत.
असे केल्याने जीवन हळूहळू अधिक सुंदर वाटू लागेल. आभार मानल्याने तुमचं लक्ष काय नाही यावरून काय आहे याकडे वळवते.
दररोज तीन छोट्या गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात जसं एखादं प्रेमळ शब्द, सुंदर सूर्यास्त, गरम चहाचा कप, कुणी मदत केली, हसवलं, अमूल्य वेळ दिला. दिवसाच्या शेवटी डोळे बंद करा आणि विचार करा “आज मला काय मिळालं?” त्यांना मनापासून धन्यवाद द्या.
5. मनात सकारात्मकता भरा
आपण काय ऐकतो, पाहतो आणि वाचतो त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. प्रेरणादायी
पॉडकास्ट ऐका. जेवढी चांगली पुस्तके मिळतील तेवढी वाचा. भीती किंवा नकारात्मकता पसरवणाऱ्यांऐवजी सकारात्मक विचार पसरवणाऱ्यांना फॉलो
करा. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीकडे स्वतःला उभारी देणाऱ्या वातावरणात ठेवायला शिका.
6. नेहमी स्वतःची काळजी घ्या
आयुष्यात आपल्या सगळ्यात जवळची आणि महत्वाची व्यक्ति कोणी
असेल तर ती म्हणजे आपण स्वत: आणि कठीण काळात self-care म्हणजे
स्वार्थीपणा नसून ती गरज असते.
पुरेशी झोप घ्या. पौष्टिक अन्न खा. थोडं चालायला जा किंवा हलका व्यायाम करा. अपराधी वाटू न देता विश्रांती घ्या.जेव्हा शरीर चांगलं वाटतं, तेव्हा मनाला लढण्याची ताकद मिळते.
7. हे ही दिवस निघून जातील यावर विश्वास ठेवा
कोणतेही वादळ कायमस्वरूपी राहत नाही. प्रत्येक कठीण काळानंतर प्रकाश येतच असतो. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक कठीण दिवसातून बाहेर पडलात हेच तुमच्या शक्तीचा पुरावा आहे. म्हणून, थोडं थांबा विश्वास ठेवा आणि स्वतःला आठवा हा क्षण तात्पुरता आहे, पण तुमचं धैर्य कायमचं आहे.
कठीण काळात सकारात्मक राहणं म्हणजे वेदना नाकारणं नाही तर वेदनेच्या मधेही आशा निवडणं आहे. जीवन परिपूर्ण नसतं, पण तरीही त्यात हसण्याची हजारो कारणं असतात.
#कृतज्ञता #सकारात्मकविचार #आनंद #मनशांती #MotivationMarathi
#LifeLessons #SelfGrowth #कृतज्ञतेचासराव #positive_thinking #marathi, #आनंद #gratitude #आनंदी_जीवनाचे_रहस्य #happiness_tips #मानसिक_शांतीचे_रहस्य #self_improvement
No comments:
Post a Comment