बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५
I can understand ....
शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५
भगवद्गीता आणि आजचे जीवन: तुमची ऊर्जा योग्य दिशेला कशी वळवाल? नियंत्रणात नसलेल्या गोष्टींचा विचार कधी थांबवणार?
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ (श्रीमद्भगवद्गीता 2.47)
महाभारताच्या युद्धभूमीत जेव्हा अर्जुन संभ्रमात पडला, शस्त्र टाकून बसला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला ‘श्रीमद्भगवद्गीता’ सांगितली. श्रीकृष्णाने
अर्जुनाला वारंवार एकच गोष्ट समजावली – "तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही." याचाच सोपा अर्थ असा की, आपली संपूर्ण शक्ती आणि ऊर्जा अशा गोष्टींवर लावा, ज्यांच्यावर तुमचा खरोखर प्रभाव पडू शकतो.
जरा विचार करा, आपण दिवसभरात किती वेळा या गोष्टींचा विचार करतो:
- लोक
आपल्याबद्दल काय विचार करतात?
- भूतकाळात कोणीतरी आपल्यासोबत वाईट का वागले?
- इतर लोक आपल्यापेक्षा पुढे का निघून गेले?
- ज्या गोष्टी घडून गेल्या, त्या तशा का घडल्या?
या अशा निरर्थक गोष्टींवर सतत विचार करत राहिल्याने आपली मानसिक ऊर्जा पूर्णपणे संपून जाते. वाईट गोष्ट म्हणजे, इतका विचार करूनही परिस्थितीमध्ये तीळमात्र बदल होत नाही. ऊर्जेचा योग्य वापर कसा करायचा ? नियंत्रणात काय आहे? श्रीकृष्ण सांगतात की, परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे कधीही श्रेयस्कर. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या स्वीकारणे आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, तिथे आपले १००% देणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे.
तुमची ऊर्जा खालील गोष्टींवर खर्च करा:
- स्वतःचे शिकणे आणि प्रगती: नवीन कौशल्ये आत्मसात करा, ज्ञान मिळवा.
- कठोर परिश्रम: तुमच्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा.
- स्वतःचे वर्तन सुधारणे: इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःचे विचार आणि स्वभाव अधिक सकारात्मक बनवा.
- पुढचे पाऊल: भूतकाळात अडकण्याऐवजी 'आता पुढे काय करायचे?' यावर लक्ष केंद्रित करा.
आजपासून हा नियम अंगीकारा! आयुष्यात शांतता आणि यश मिळवायचे असेल, तर आजपासूनच स्वतःला एक मंत्र द्या. "जिथे माझे नियंत्रण नाही, तिथे मी माझी ऊर्जा वाया घालवणार नाही. आणि जिथे माझे प्रयत्न कामी येऊ शकतात, तिथे मी माझे पूर्ण लक्ष केंद्रित करेन." जेव्हा तुम्ही हा दृष्टिकोन स्वीकारता, तेव्हा तक्रारी आणि निराशा संपते आणि खऱ्या विकासाला सुरुवात होते.
नेहमी लक्षात ठेवा, तुमची ऊर्जा मर्यादित आणि मौल्यवान आहे. ती तक्रारी करण्यात, इतरांचा हेवा करण्यात किंवा भूतकाळाचा शोक करण्यात वाया
घालवू नका. ती ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी आणि योग्य कर्मासाठी वापरा. आपली ऊर्जा
योग्य ठिकाणी वापरणे, हाच सुखी आणि
यशस्वी जीवनाचा खरा मार्ग आहे.
शेवटी काय लाईफ एकदाच मिळते, आणि ज्या गोष्टीने आनंद मिळेल ती गोष्ट तर नक्कीच केली पाहिजे. नाही का ?
कसा वाटला हा सुखी आणि यशस्वी जीवनाचा मार्ग ?? तुम्ही सुखी आणि यशस्वी जीवना साठी कोणता मार्ग अवलंबता ??
मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५
आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद आणण्याचे 7 सोपे रहस्य
आयुष्य कधीच सरळमार्गी नसते. आपण सर्वचजण अशा क्षणांना नेहमी सामोरे जातो जे आपली परीक्षा घेतात, जस की नोकरी जाणे, नातं तुटणे, आरोग्याच्या समस्या किंवा भविष्याबद्दलची अनिश्चितता. अशा वेळी हरल्यासारखं, थकून गेल्यासारखं आणि हरवल्यासारखं वाटणं अगदीच स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. पण आयुष्यात सकारात्मक राहणं म्हणजे सगळं ठीक असल्याचं भासवणं नाही तर कठीण काळातही आशा, धैर्य आणि शांतता शोधणं हे आहे. कठीण काळात आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी काही सकारात्मक गोष्टी आपण अमलात आणू शकतो जसे की ..
1. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्या स्वीकारणे
कोणत्याही गोष्टीत शांततेकडे जाण्याचे पहिले पाऊल
म्हणजे स्वीकार. आनंदी जीवन जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक परिस्थितिचा आनंदाने
स्वीकार करणे. जेव्हा आपण नियंत्रणात नसलेल्या गोष्टींशी लढणं थांबवतो, तेव्हा आपण आपली ऊर्जा त्या गोष्टींवर केंद्रित करू शकतो जे आपण
बदलू शकतो. जॉर्ज ऑरवेल म्हणतात “आनंद फक्त स्वीकारामध्येच अस्तित्वात असतो.”
“हे माझ्याच बाबतीत का घडलं?” असं विचारण्याऐवजी, “मी यातून काय शिकू शकतो?” असं विचारा. या छोट्याशा विचारातील बदलामुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे नक्कीच बदलू शकतो.
2. मन मोकळं करायला शिका
भावना दाबून ठेवणं मनुष्याला नेहमी अधिक जड बनवतं. आपल्या
भावना विश्वासू व्यक्तीशी, जीवनसाथी, एखादा जवळचा मित्र-मैत्रीण, आई-वडील, भाऊ-बहीण यांच्या सोबत बोलून मन मोकळं करू शकता. यामुळे मनावरील ओझं नक्कीच हलकं होईल. मन मोकळं करणं म्हणजे आपल्या भावनांना शब्द देणं आणि ते
योग्य व्यक्तीसमोर करणं खूप गरजेचं असतं.
जर आपल्याला बोलायला मन मोकळ करायला कोणीच नसेल तर आपण आरशासमोर स्वतःशी बोलून मन मोकळ करू शकतो. जर तसेही करू शकलो नाही तर एक
डायरी घेऊन त्यात लिहिल्याने मन हलकं होईल आणि विचार अधिक स्पष्ट होतील. कधी कधी आपल्या सारख्याच अनुभवातून गेलेल्या लोकांशी
बोलणंही मदत करतं. त्यांनी जे अनुभवलं आहे तेच लोक आपल दु:ख समजू शकतात. तज्ज्ञ व्यक्ती, ईश्वर, गुरु, निसर्ग, प्रार्थना, ध्यान या गोष्टी देखील मदत करू शकतात. आपल्या
संघर्षांविषयी बोलणं आपल्याला कमजोर बनवत नाही, तर ते आपल्याला मानवी बनवतं.
3. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा
आपण भूतकाळ आठवून किंवा भविष्याची भीती बाळगूनच जास्त
चिंताग्रस्त होतो. Mindfulness म्हणजे
फक्त “आत्ता” या क्षणात राहणं, हे मन शांत ठेवण्यास मदत
करतं.
एक साधा उपाय करून पाहा: एक दीर्घ श्वास घ्या. आजूबाजूच्या आवाजांकडे, रंगांकडे, सुगंधांकडे लक्ष द्या. स्वतःला आठवा “मी आत्ता सुरक्षित आहे.” दररोज काही मिनिटे अशी जाणीवपूर्वक विश्रांती घेतली तरी मनात स्पष्टता आणि शांती निर्माण होते.
4. नेहमी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी/कृतज्ञ राहणं
दररोज कृतज्ञतेचा सराव केल्याने ताण कमी होतो, मन शांत राहतं आणि आयुष्यात समाधान वाढतं. कृतज्ञता म्हणजे काहीतरी
मिळालं म्हणून आनंदी होणं नाही, तर आनंदी असल्यामुळे मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी
राहणं आहे. दररोज काही क्षण मनापासून “धन्यवाद” म्हणा. स्वतःला, जीवनाला, आणि त्या छोट्या क्षणांना जे तुम्हाला नेहमी आनंदी बनवत.
असे केल्याने जीवन हळूहळू अधिक सुंदर वाटू लागेल. आभार मानल्याने तुमचं लक्ष काय नाही यावरून काय आहे याकडे वळवते.
दररोज तीन छोट्या गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात जसं एखादं प्रेमळ शब्द, सुंदर सूर्यास्त, गरम चहाचा कप, कुणी मदत केली, हसवलं, अमूल्य वेळ दिला. दिवसाच्या शेवटी डोळे बंद करा आणि विचार करा “आज मला काय मिळालं?” त्यांना मनापासून धन्यवाद द्या.
5. मनात सकारात्मकता भरा
आपण काय ऐकतो, पाहतो आणि वाचतो त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. प्रेरणादायी
पॉडकास्ट ऐका. जेवढी चांगली पुस्तके मिळतील तेवढी वाचा. भीती किंवा नकारात्मकता पसरवणाऱ्यांऐवजी सकारात्मक विचार पसरवणाऱ्यांना फॉलो
करा. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीकडे स्वतःला उभारी देणाऱ्या वातावरणात ठेवायला शिका.
6. नेहमी स्वतःची काळजी घ्या
आयुष्यात आपल्या सगळ्यात जवळची आणि महत्वाची व्यक्ति कोणी
असेल तर ती म्हणजे आपण स्वत: आणि कठीण काळात self-care म्हणजे
स्वार्थीपणा नसून ती गरज असते.
पुरेशी झोप घ्या. पौष्टिक अन्न खा. थोडं चालायला जा किंवा हलका व्यायाम करा. अपराधी वाटू न देता विश्रांती घ्या.जेव्हा शरीर चांगलं वाटतं, तेव्हा मनाला लढण्याची ताकद मिळते.
7. हे ही दिवस निघून जातील यावर विश्वास ठेवा
कोणतेही वादळ कायमस्वरूपी राहत नाही. प्रत्येक कठीण काळानंतर प्रकाश येतच असतो. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक कठीण दिवसातून बाहेर पडलात हेच तुमच्या शक्तीचा पुरावा आहे. म्हणून, थोडं थांबा विश्वास ठेवा आणि स्वतःला आठवा हा क्षण तात्पुरता आहे, पण तुमचं धैर्य कायमचं आहे.
कठीण काळात सकारात्मक राहणं म्हणजे वेदना नाकारणं नाही तर वेदनेच्या मधेही आशा निवडणं आहे. जीवन परिपूर्ण नसतं, पण तरीही त्यात हसण्याची हजारो कारणं असतात.
#कृतज्ञता#सकारात्मकविचार #आनंद #मनशांती #MotivationMarathi #LifeLessons #SelfGrowth #कृतज्ञतेचासराव #positive_thinking #marathi, #आनंद #gratitude #आनंदी_जीवनाचे_रहस्य #happiness_tips #मानसिक_शांतीचे_रहस्य #self_improvement
तुमचा मेंदू तुम्हाला फसवतोय? जाणून घ्या विचारांचा 'हाजीर तो वजीर' खेळ!
जे सहज आठवतं तेच खरं असतं का? (हा लेख तुमचे विचार बदलून टाकेल!) कधी कधी तुमच्या बाबतीत असे होते का? सकाळी सकाळी एखादी वाईट बातमी पाहता, अनुभ...
-
खूप दिवसांपासून अमृता-प्रभाकर चे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक पाहायचे होते पण वेळ मिळत नाही, दूर आहे, पुढच्या...
-
लग्न पहावे (न) करून ऑफिस मध्ये त्या दिवशी ठीक वाटत नव्हते म्हणून दवाख्यान्यात चेक अप करायला गेले. नेहमीप्रमाणे गर्दी भरपूर होती. (ह...
-
फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...

