कथेची सुरुवात एका रात्री
बुरखा घालून ४ जन ATM लूटतात आणि एका साध्या हरवलेल्या टेपरेकॉर्डरच्या
तक्रारीपासून होते, ज्यामध्ये
प्रीतमच्या (वीर हिरानी) आजीच्या आवाजातील शेवटचे गाणे रेकॉर्ड केलेले असते.
दुसरीकडे, ओल्ड-स्कूल पद्धतीचा पोलीस
अधिकारी पेड्रो गोन्साल्विस (अर्शद वारसी) एका चुकीमुळे सायबर सेलमध्ये बदली/पनिशमेन्ट
पोस्टिंग होऊन येतो. जेव्हा एका
हाय-प्रोफाईल मंत्र्याच्या मुलाचे अपहरण होते, तेव्हा पेड्रो आणि प्रीतम (डेटा व्हर्सेस दंडा) एकत्र येतात. सायबर क्राईम, डार्क वेब, हॅकिंग आणि 'ब्लू व्हेल' सारख्या ऑनलाईन
गेम्सच्या जाळ्यात अडकलेली ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
अर्शद वारसी (पेड्रो) एका रागीट, टेक्नॉलॉजी न कळणाऱ्या पण फिल्डवर हुशार असलेल्या गोवन पोलिसाच्या भूमिकेत
अर्शद वारसीने कमाल केली आहे. त्याची कॉमिक टाइमिंग आणि डायलॉग डिलिव्हरी सिरीजचा
मुख्य कणा आहे. राजकुमार
हिरानींचा मुलगा वीर हिरानी(प्रीतम) याने या सीरीजमधून पदार्पण केले आहे. एका शांत, अंतर्मुख आणि हुशार हॅकरच्या भूमिकेत तो अत्यंत नैसर्गिक वाटला आहे. अर्शद
वारसीसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना त्याचा आत्मविश्वास
वाखाणण्याजोगा आहे. नकारात्मक
भूमिकेत विक्रांत मॅसी
(मार्टिन) आणि बोमन
इराणी व मोना सिंग यांचे कामही नेहमीप्रमाणे उत्तम झाले आहे.
राजकुमार हिरानी यांनी ही वेब
सिरिज 'हिडन फाइल्स' या अमित दुबे यांच्या पुस्तकावरून प्रेरित होऊन लिहिली आहे.
हिरानींची सिग्नेचर स्टाईल म्हणजेच गंभीर विषयातही एमोशन्स आणि हलकी-फुलकी कॉमेडी गुंफणे, इथेही यशस्वी झाले आहे. दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी गोव्याची पार्श्वभूमी आणि सायबर क्राईमचे तांत्रिक विश्व अतिशय
वास्तववादी पद्धतीने पडद्यावर मांडले आहे.
६ भागांची ही मिनी-सीरीज एकूण
३ तासांची असून ती कुठेही रेंगाळत नाही. एका बैठकीत संपवावी अशीच ही सिरीज आहे. शेवटच्या भागातील आजीचे गाणे केवळ कथेला पूर्ण
करत नाही, तर प्रेक्षकांच्या डोळ्यात
पाणी आणून एक गोड अनुभूती देऊन जाते. सायबर क्राईमवर आधारित असूनही, यात अनावश्यक हिंसाचार किंवा अश्लीलता नाही, त्यामुळे ती कुटुंबासोबत पाहता येते.
'प्रीतम अँड पेड्रो' हा सस्पेंस, थ्रिलर, हॅकिंग आणि
निखळ मनोरंजनाचा एक उत्तम मेळ आहे. जर तुम्हाला मुन्नाभाई किंवा ३ इडियट्स सारखा
भावनिक टच असलेला आणि खिळवून ठेवणारा सायबर ड्रामा पाहायचा असेल, तर जियोहॉटस्टारवर ही सीरीज नक्कीच चुकवू नका!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा