Monday, 30 April 2018

NUDE

कपड़ा जिस्म पे पहनाया जाता है , रूह पे नहीं...




‘नावात काय असतं’ असं शेक्सपियर म्हणून गेलाय, पण नावातच बरंच काही असतं. NUDE (न्यूड) असं काही वाचलं कि लगेच भुवया उंचावल्या जातात. अश्लीलता, वासना वगैरे डोळ्यासमोर येते. पद्मावत नंतर नुसत्या नावावरून या चित्रपटाला विरोध दर्शवला गेला होता, म्हणून पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

‘न्यूड’ हि यमुना आणि तिची मावशी चंद्राक्का यांची कथा आहे. आपल्या मुलाला खूप शिकवून मोठं करायचं बास एवढच यमुनाच्या डोक्यात असतं. नवरा दारुडा त्यामुळे त्याचा संसाराला आर्थिक हातभार कमी तर असतोच वर ती जे काय कमवते त्यावर त्याचा डोळा आणि हे कमी कि काय म्हणून माणिक सोबत त्याचे विवाहबाह्य संबध असतात. अशा या जाचाला कंटाळून ती मुलासह मुंबईला तिच्या मावशीकडे येते. मुंबईला आल्यावर ती अनेक दिवस काम शोधते. पण काही केल्या तिला काम मिळत नाही. तिची मावशी एका आर्ट कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करत असते आणि शिपायाचे काम करण्यासोबतच ती ‘न्यूड मॉडेल म्हणून काम करत असते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी हे करण्यात काहीच चुक नाही असे तिचे म्हणणे असते आणि यासाठी तिला चांगला पैसा देखील मिळत असतो. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे हीच केवळ यमुनाची इच्छा असल्याने ती देखील हे काम करायला लागते. तिचे कामाबद्दलचे प्रेम, मुलाला मोठे बनविन्याचे स्वप्न.. इथून पुढे  सुरु होतो यमुनाचा न्यूड मॉडेलचा प्रवास.

नावाप्रमाणे हा चित्रपट कुठेही आपली सीमा पार करत नाही कुठेही तो बोल्ड होत नाही. चंद्राक्का हे पात्र खूपच भाव खाऊन जातं. तिचा SWAG, बोलण्याची लकब, तिचा वट, तसंच यमुनेनं पैसे मिळवण्यासाठी न्यूड मॉडेलम्हणून काम करावं यासाठी तिला सुरुवातीला त्यामध्ये काही गैर नाही असं म्हणत बाईनं अंगावर कितीही कपडे घातले तरी पुरुषी नजरेतून तिच्या अंगावर तसा एकही कपडा नसतो असं पटवून देणारी चंद्राक्का. कल्याणी मुळे नि यमुना अतिशय सुंदरपणे साकारली आहे, न्यूड मॉडेलम्हणून सुरुवात करतानाचे एक्सप्रेशन, मुलाला समजावताना+त्याचे चांगले भवितव्य घडवीण्यासाठी, कलेचे स्वातंत्र्य जपावे यासाठी पाउल उचलणारी, तिचा अभिनय खूपच नैसर्गिक वाटतो. या चित्रपटाची सिनेमटोग्राफी खूपच सुंदर आहे. जी काही गाणी आहेत ती BACKGROUND ला साजेशी आहेत. संथ गतीने एक एक टप्पा पार करत चित्रपट पुढे सरकत जातो आणि सध्याच्या कलेची झालेली अवस्था दाखवून देतो. आपल्या अंदाजाने आपण कथेचा शेवट ३-४ प्रकारे डोक्यात ठेवतो; असं होईल तसं होईल पण होतं वेगळंच. या चित्रपटाचा शेवट म्हणजे खूपच मोठी चपराक आहे. काही वेळ आपल्याला सुन्न करून सोडणारा आहे. वेगळा आणि संवेदनशील विषय खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे. आर्ट फिल्म आवडनार्यांनी हा चित्रपट पहायला हरकत नाही. ज्यांना मिर्च मसाला फिल्म्स आवडतात त्यांना बहुतेक नाही आवडणार. आणि हो चित्रपट बघताना SUBTITLE चुकून हि वाचू नये.


No comments:

Post a Comment

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...