Sunday, 29 December 2019

''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' - The Power Game



खूप दिवसांपासून अमृता-प्रभाकर चे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक पाहायचे होते पण वेळ मिळत नाही, दूर आहे, पुढच्या वेळी येते अशी वेगवेगळी कारण देत आज तो योग आला. आपल्या मित्र-मैत्रिणींना पहिल्यांदाच रंगमंचावर अभिनय करताना बघतानाचा आनंद काही वेगळाच असतो. आवाज, वेशभूषा, अभिनय, सगळंच भारावून टाकणारं. निशाला आपलं प्यादं बनवून हवं तसं नाचवता येण्यासाठी, आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी तिचा हवा तसा शारीरिक आणि मानसिक उपभोग घेण्यासाठी मुग्धाची खेळी म्हणजेच  ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक म्हणजे लहानपणापासून वेश्यावस्तीत वाढलेला रघु(प्रभाकर पवार), गावाकडून आलेली, आयटी विभागात काम करत गावाकडचं कुटुंब सांभाळणारी निशा(सुजाता कांबळे) आणि वकिली क्षेत्रात आपला ठसा उमठवलेली आपल्याला हवं ते आणि तेही कुठल्याही परिस्थितीत मिळवणारी 'पॉवर वुमन' मुग्धाची(अमृता ओंबळे ) कहाणी.  वेश्यावस्तीत वाढल्यामुळे तिथल्या समस्या, तिथल्या महिलांचे होणारे शारीरिक शोषण रघु जवळून पाहत आल्याने तिथल्या जास्तीत जास्त महिलांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून तो धडपडतो आहे. दुसरीकडे निशा जी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या हेतूने आपले गावचे घर सोडून शहरात आली आहे.  पैसे कमावण्याच्या नादात ती समलैंगिक वासनेच्या  वेगळ्याच भोवरयात सापडली आहे. रघूच्या येण्याने आपल्यावर होत असलेला समलैंगिक छळ आणि त्यातून रघुवरील प्रेम आणि त्याशिवाय आपल्याला कोणी बाहेर काढू शकनार नाही हा आत्मविशास. या प्रेम कहाणी मध्ये एक स्त्री असूनही जिला स्त्री देह उपभोगायची चटक लागलेली आहे आणि जी शेवट पर्यंत पुरुष जातीचा तिरस्कार करत आपल्याकडील पाॅवर्स चा गैरउपयोग करणारी मुग्धा. 


 

हे नाटक प्रत्यक्ष बघण्यात जे थ्रिल आहे ते इथे सांगण्यात नाही. कारण हे नाटक आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असले तरीही आपण या नाटकात अप्रत्यक्षरीत्या जोडले जातो. नाटक संपल्यावर काही गोष्टी आपल्या मेंदूत गुणगुणत राहतात.अतिशय संवेदनशील असा समलैंगिकतेचा विषय हाताळत असतानाच दुसरीकडे सगळेच पुरुष एक सारखे नसतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. निशाची होणारी घुसमट अंगावर येते. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी निशा असतील ज्या अशा शारीरिक छळाच्या शिकार असतील. इच्छा असूनही या गर्तेतून बाहेर पडता येत नाही.  माणूस पॉवर चा उपयोग करून कोणत्याही थराला जाऊ शकतो का ? आपलं सोशल स्टेटस जपण्यासाठी आपण लेस्बियन आहोत हे जगापासून लपवून ठेवतो? आपल्याला हवं तसं जगता येण्यासाठी मग त्यात कोणाचाही बळी गेलेला चालतो ? कुठेतरी विचार करायला लावणारं, काहीतरी खटकतंय, सुन्न करनारं आणि डोक्याला झिणझिण्या आणणारं नाटक म्हणजे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



Friday, 1 March 2019

तुला कळणार नाही .....


संसार गाडा !!! एकट्याचा कि दोघांचा ??  मी रोज एकटीनेच ओढायचा का??  तू सकाळी उठणार राजेशाही थाटाने ... मी आपली सकाळी 5 लाच उठलेली ... मुलांचं सगळं आवरा आवरी करा ... त्यांच्या उठण्या पासून ते आंघोळी, नाष्टा, शाळेचा डबा ते त्यांना रिक्षात सू पर्यंत सगळंच करा... तू आपलं आरामात उठणार ... चहा दे गं ... मग तो पेपर हातात घेत ... वाचतो कि नुसतच बघतो .. तुझं  तुलाच माहित .... तासभर ते पेपर-चहा प्रकरण झालं कि ... तुझ्या अंघोळीसाठी पाणी पण मीच काढून द्यायच ... तुझं शर्ट इस्त्री करूनही मीच ठेवायचा ... माझी इकडे तारेवरची कसरत तुला कधी कळलीच नाही ...तुझ्यासाठी डब्बा करा तो हि मीच भरून द्यायचा ... तू आरामात तुझं आवरणार... डब्बा उचलणार .. गाडी ला किक मारून गेला ऑफिसला ... माझ्या ऑफिस च काय ??? मीही  नोकरी करतेच ना... तू गेल्यावर मी माझा सगळं आवरून हाताला लागेल तो ड्रेस घालून बाहेर पडणार ... दिवसभर ऑफिस च काम ... त्यातही डोक्यात विचार .. संध्याकाळी भाजी काय करायची ?? .. पोरांच्या डब्ब्याला उद्या काय करायचा?? .. मधेच कामाच्या डेडलाईन्स ... लंच ब्रेक मधे ऑफिस च्या मैत्रिणी त्यांचे किस्से सांगणार .. आज सासर्यांनी पोरांना शाळेत सोडल ... सासूबाई नी हे केला ते केल ... नवऱ्याने हे केल...  आपल्याकडे तर तो पण पर्याय  नाही ... ते दोघही गावाकडे ... आपल चौकोनी कुटुंब ... घरात चार टोकाला चार जन ... संध्याकाळी ऑफिसमधून कधी एकदा निघेल असं विचार करत निघते ... गाडी जसा वेग घेते तस विचारचक्र सुरु .. जाताना भाजी घ्यायची ... लाईट बिल तुला भरायला सांगितलं होतं ... सिलेंडर बुक करायला लावला होता तुला ... गेल्यावर मुलांचा अभ्यास ... नानाविध विचार ... घरी पोहचते तर तू आधीच आलेला ... टीवी आणि तू ... मुलं गेम्स खेळण्यात व्यग्र .... पर्स ठेवून मी कामाला लागलेली ...तुला दिलेल्या कामाची आठवण करून दिली .. नेहमीप्रमाणे तू विसरलेला .... जेवण वाढून घ्यायला पण तुझी मदत नाही ... तू आणि टीवी मग्न .... जेवणानंतर मुलांचा अभ्यासही मीच घ्यायचा .... मग तू आणि मोबाइल ... स्वयंपाकघरातील आवाराआवर .... तुला बोलायला वेळ नाही माझाशी ... तू झोपून गेलेला.... पुन्हा नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात आणि पुन्हा तेच चक्रव्यूह ...थोड्याश्या अपेक्षा असतात ... सकाळच्या कामात थोडीशी मदत ... सगळच नाही पण जमेल ते काम दोघ मिळून करू ... रात्री स्वयंपाकघरात थोडी मदत ... दिवस कसा गेला एवढा जरी विचारला ना तरी खूप होत रे ... खूप धावपळ होतीये रे माझी .. एकसाथ 2 मुलांना सांभाळणं आणि त्यात तू एक तिसर्या मुलासारखं वागतो ... कधीतरी कौतुकाची अपेक्षा मलाही असते ... आपण दोघही एकाच वयाचे .... तुला जसं जगावं वाटत असेल तसं मलाही वाटत असेल ना???.. 


लक्ष दे तिच्याकडे ... तुला काय वाटेल या विचारात ती तिला काय वाटते हे ती कधी व्यक्त होईल कि नाही माहित नाही ...

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...