रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

निसर्गाचा चमत्कार: देवकुंड धबधबा

 पुण्यातील धावपळीच्या आयुष्यातून वीकेंडला निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी पश्चिम घाटासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. त्यातही पावसाळा सुरू झाला की ट्रेकर्सना वेध लागतात ते सह्याद्रीतील धबधब्यांचे. पुण्याजवळ ताम्हिणी घाटाच्या कुशीत लपलेला देवकुंड धबधबा (Devkund Waterfall) हा सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि थरारक पावसाळी ट्रेक मानला जातो. जर तुम्ही या पावसाळ्यात एका अद्भुत अनुभवाच्या शोधात असाल, तर देवकुंड ट्रेक तुमच्यासाठी अगदी परिपूर्ण आहे.



रायगड जिल्ह्यातील भिरा (पाटणूस) गावाजवळ दाट जंगलात हा भव्य धबधबा वसलेला आहे. साधारण ३०० फूट उंचीवरून एका विस्तीर्ण काळ्या पाषाणाच्या डोंगरातून कोसळणारा हा पांढराशुभ्र पाण्याचा प्रवाह डोळ्यांचे पारणे फेडतो. या धबधब्याच्या खाली एक लहान कुंड (तलाव) तयार झाले आहे, ज्यातील पाणी अत्यंत स्वच्छ आणि निळसर रंगाचे दिसते. तीन नद्यांचा (कुंडलिका, अंबा आणि पातळगंगा) उगम याच परिसरातून होतो, अशी स्थानिक मान्यता आहे. म्हणूनच या जागेला 'देवकुंड' म्हणजेच देवाचे स्नानगृह म्हटले जाते.
ट्रेकची महत्त्वाची माहिती (Trek Overview)
  • पुण्यापासून अंतर: अंदाजे १०० ते ११५ किमी (ताम्हिणी घाट मार्गे)
  • ट्रेकची काठिण्य पातळी: मध्यम (Moderate)
  • ट्रेकचे अंतर: एका बाजूने साधारण ४.५ ते ५ किलोमीटर (जाण्या-येण्याचे एकूण ९-१० किमी)
  • लागणारा वेळ: भिरा गावातून धबधब्यापर्यंत चालत जाण्यासाठी २ ते २.५ तास लागतात.
प्रवास कसा करावा? (How to Reach)
पुण्यावरून स्वतःच्या गाड्यांनी (कार किंवा बाईक) जाणे सर्वात सोयीचे पडते. पुण्यावरून निघून चांदणी चौक, पौड रोड, मुळशी धरण आणि पुढे सुंदर अशा ताम्हिणी घाटातून खाली उतरून विळे भागाड MIDC कडे जावे लागते. तिथून पुढे पाटणूस मार्गे तुम्ही भिरा गावाला पोहोचू शकता. हा संपूर्ण प्रवास साधारण ३ ते ३.५ तासांचा असून पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे ढगांमधून प्रवास केल्यासारखा भास होतो. भिरा गावात पर्यटकांसाठी पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे.
जंगलातील थरारक पायवाट (The Trail Experience)
देवकुंडचा ट्रेक हा केवळ धबधबा पाहण्यापुरता मर्यादित नसून, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अत्यंत थरारक आहे. ट्रेकची सुरुवात भिरा धरणाच्या जलाशयाच्या कडेने होते. सुरुवातीचा रस्ता सपाट आणि सोपा आहे. त्यानंतर तुम्ही 'भिरा देवराई'च्या दाट जंगलात प्रवेश करता. पावसाळ्यात हे जंगल संपूर्णपणे हिरवेगार आणि धुक्याने वेढलेले असते.
वाटेत तुम्हाला लहान-मोठे २ ते ३ ओढे आणि नाले ओलांडावे लागतात. पावसाळ्यात या ओढ्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढलेला असतो, त्यामुळे ते पार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. प्रशासनाने काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी दोर आणि लोखंडी पूल तयार केले आहेत. ट्रेकचा शेवटचा १५-२० मिनिटांचा टप्पा हा काहीसा चढणीचा आणि निसरड्या खडकांचा आहे. हा चढ चढून गेल्यावर अचानक समोर येणारा विस्तीर्ण देवकुंड धबधबा पाहून प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा होतो.
नियम, खर्च आणि स्थानिक व्यवस्था
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि स्थानिक रोजगारासाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि वन विभागाने येथे चोख व्यवस्था केली आहे:
१. प्रवेश शुल्क: प्रति व्यक्ती अंदाजे ₹१०० ते ₹२०० वन विभाग शुल्क आकारले जाते.
२. गाईड अनिवार्य: जंगलात वाट चुकण्याची शक्यता असल्याने प्रत्येक ग्रुपसोबत स्थानिक गाईड (वाटाड्या) असणे बंधनकारक आहे.
३. वेळेचे बंधन: सकाळी ६:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंतच ट्रेकर्सना जंगलात प्रवेश दिला जातो. सायंकाळी ५ वाजेच्या आधी सर्वांना बेस विलेजला परत यावे लागते.
४. जेवणाची सोय: भिरा गावात स्थानिक लोकांच्या घरांमध्ये किंवा लहान हॉटेल्समध्ये अस्सल महाराष्ट्रीयन जेवण (पिठलं-भाकरी, चिकन थाली) अगदी माफक दरात मिळते.
सुरक्षेची काळजी आणि टिप्स (Safety Rules)
  • अतिवृष्टीत जाणे टाळा: मुसळधार पाऊस असताना धबधब्याच्या मुख्य कुंडात उतरण्यास सक्त मनाई असते, कारण तिथे पाण्याचा वेग अचानक वाढतो (Flash Floods). अशा वेळी वन विभाग ट्रेक पूर्णपणे बंद ठेवतो.
  • योग्य पादत्राणे: ट्रेकसाठी चांगली ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज किंवा स्पोर्ट्स शूज वापरा. चप्पल किंवा सँडल घालून जाणे टाळा.
  • साहित्य: मोबाईल आणि कॅमेरा साहित्यासाठी वॉटरप्रूफ बॅग, रेनकोट, आणि सोबत ओळखीचा पुरावा नक्की ठेवा. जंगल प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी कचरा कुठेही टाकू नका.



देवकुंडचा हा मान्सून ट्रेक तुम्हाला निसर्गाच्या एका वेगळ्याच रूपात घेऊन जातो. वीकेंडला निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार डोळ्यात साठवण्यासाठी देवकुंड धबधब्याला नक्की भेट द्या!

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

​10- 12 days without ​ ​(SMART)phone




स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्याचे ऑपरेशन होताना पाहणे म्हणजे कॉन्जुरिंग २ पाहण्यापेक्षाही डेन्जर होते. लहानपणीपासूनच डॉक्टर, दवाखाना यांची ऍलर्जीच म्हणावी लागेल. कधी त्याचा एवढा संबंध आला नाही ना. एकदा पडले होते आजारी..  तेव्हा एक्सरे काढायचा होता ५-१० मिनिटं लागणाऱ्या एक्सरे मध्ये २-३ दा चक्कर येउन पडली होती मी. त्यापुढे  कधी दवाखान्याचा संपर्क आलाच नाही. आत्ता आला तोही एका डोळ्याचे  ऑपरेशन करायचे म्हणून.

ऑपरेशन करून घ्यायचा माझा पहिलाच अनुभव; आणि आपल्या आवडत्या गोष्टीवर किंवा  इंद्रियावर असेल तर जास्तच टेन्शन असतं. ते नीट होईल का? काही अडचण तर नाही ना येणार? आपल्याला नीट दिसेल ना? अजून किती दिवस असा डोळा बंद राहील? डोळ्याचा नंबर तर नाही ना वाढणार? आणि वाढला तर असा मोठ्या भिंगाचा चष्मा लावावा लागणार... असे नानाविध विचार डोक्यात यायला लागतात.

एकदाचा तो दिवस उजाडला. डॉक्टर म्हणलेले १०-१५ मिनिटाच काम आहे जास्त वेळ लागणार नाही. अस बोलता बोलता होऊन जाईल...  ही डॉक्टर लोक असला भारी दिलासा देतात ना (?) एक नर्स जवळ आली तिच्या हातातल्या आय ड्रॉप मधले ३-४ थेंब (भसाभसा - काही कळायच्या आतच) डोळ्यात टाकले आणि बसा ५ मिनिट म्हटली. ५ मिनिटं झाली नंतर पुन्हा ती आली पाणी तिने आधीचीच कृती पुन्हा केली. आणि आत घेऊन गेली. आत जाता जाता वरील विचारांनी पुन्हा डोक्यात गर्दी केली.

दवाखान्यातल्या त्या बेड वर पडल्यावर नर्सने पुन्हा भूल देणारे ड्रॉप्स डोळ्यात टाकले आणि डोळा असा २-३ चिमटे लावून ठेवला. भूल दिल्याने काय चाललेय ते दिसत तर होते पण काही फील होत नव्हते .  डॉक्टर सांगत होते...आता इंजेकशन देतोय.. आता सिस्ट काढतोय... आता ते निघाला... सिस्ट आतमध्ये वाढल्यामुळे टाके टाकावे लागतील... मी ह्म्म्म, ओके ..  हा.. हो ..  बरं  करत होते...  आता टाके टाकतोय...  असं करत फायनली १५-२० मिनिटांत ओपेशन झाले. आणि ऑपरेशन झालेल्या डोळ्यावर हा भला मोठा कापसाचा बोळा लावला आणि माझा एक  डोळा काही दिवसांसाठी बंद झाला.

डॉक्टर तर म्हटलेले काही काळजी करायची गरज नाही १-२ दिवस सुट्टी घ्या आणि लगेच बरे वाटेल. म्हटलं चला १-२ दिवसात ऑफिस ला जाऊ लागू आणि कसलं काय दुसऱ्या दिवशी तर डोळाच उघडवेना इकडे तिकडे बघायला गेला की दुखायला लागायचा. घरच्यांनी सांगून टाकलं जोपर्यंत ठीक वाटत नाही तोपर्यंत नो ऑफीस, नो फोन (स्मार्टफोन), नो टीव्ही, नो लॅपटॉप - पीसी .. झालं एकटा  जीव सदाशिव !! रोज काळा  चष्मा लावून बसायचं. १०-१५ मिनिटांत झालेल्या ऑपरेशन ला १०-१५ दिवसांची सुट्टी घेतल्यानंतर बरं वाटायला लागलं. नंतर अजून १५ दिवस टाके विरघळायला लागले. आणि सगळे टाके विरघल्यावर पीसी वरील माझे काम सुरू झाले.

पण ते १५-२० दिवस फोनशिवाय घालवणे म्हणजे दिव्य होते. :P व्हाट्स अप नाही, एफबी नाही, इंस्टाग्राम नाही, टीव्ही-मुव्ही नाही, ऑफिसला जाऊनही फक्त पीसी न वापरता येणारी कामे करायची. स्मार्टफोन, पीसी, सोशल मीडिया यांचे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे स्थान झाले आहे नाही. त्याशिवाय लाईफ मध्ये मजाच नाही असे वाटते.




गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

Sports Reality .. खोला बॉक्स… निकला सामोसा …





काही दिवसांपूर्वी एका क्रीडा पुरस्काराला जाण्याचा योग आला. हा कार्यक्रम शहरापासून जरा दुर होता. पुरस्कारार्थी सगळे पंधरा वर्षाच्या आतील म्हणजे पहिली ते नववी पर्यंतचे मुल-मुली त्यात होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी बारा वाजताची होती. आपल्याकडे लग्नाला जायच म्हटलं कि लोक थोड उशिरा जातात, कारण असतं कि भारतात लग्न कधी वेळेवर सुरु होत नाहीत. परंतु, शाळेत भेट द्यायला कुणी 'मोठा व्यक्ती' येणार असेल तर मुलांना किमान एक-दोन तास तरी वेळेच्या आधी बोलावून घेतात. या कार्यक्रमाचं देखील असंच झालं. कुणी मंत्री संत्री येणार होते ज्यांचा हस्ते मुलांना पुरस्कार दिले जाणार होते. बारा वाजताच्या कार्यक्रमाला या मुलांना दहा वाजताच आणून बसवलं  होतं. 



क्रीडा विश्वात खेळाडू काय काय कामगिरी करतात हे सामान्य लोकांना कधीच कळत नाही. बिग बॉस मध्ये एक गेम अशी होती कि त्यामध्ये घरातील सदस्यांना स्वतःच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवरून स्वतःला पॉईण्ट्स द्यायचे होते. यामध्ये संग्राम सिंग हा खेळाडू असून त्याने काय कामगिरी केली हे घरातील सदस्यांना काय दर्शकांना देखील माहित नव्हते पण जेव्हा सलमान खानने शनिवारचा भागात त्याची कामगिरी सांगितली तेव्हा सर्वचजन थक्क झाले. भारतात फक्त काही ठराविक खेळाडूच सामान्य लोकांच्या ओळखीचे आहेत उदा. सचिन, धोनी, विराट  म्हणजेच जे क्रिकेट मध्ये आहेत फक्त तेच … बाकी खेळाडू कोणाच्या खिजगणतीत देखील नाही. 

माझी एक मैत्रीण अथलेटीक्स मध्ये होती,  ती सांगायची तिचा प्रक्टिससाठी होणारा खर्च आणि तिला मिळणाऱ्या  पुरस्काराची रक्कम म्हणजे "चार आण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला" अशी तर्हा होती. आजच्या कार्यक्रमात देखील असच काहीसं झालं होतं एक वाजत आला होता तरी कार्यक्रम सुरु झाला नव्हता. सकाळी दहा वाजता येउन बसलेली मुलं दुपारी एक वाजेपर्यंत भुकेनं तळमळत बसली हो. शेवटी मंत्रीमहोदय तर आलेच नाही पण जे कोणी प्रमुख? पाहुणे आले होते त्यांच्या उपस्थितीत  कार्यक्रम सव्वाला सुरु झाला. मुलांचे त्या कार्यक्रमात लक्ष पण नव्हते त्यांचं लक्ष होतं इथून बाहेर कसं पडता येईल आणि काहीतरी कसं खाता येईल. कसाबसा तो कार्यक्रम  दिमाखात? पार पडला. गेटजवळ मिठाईचे बॉक्स वाटप सुरु होतं. सगळी मुलं तिकडे तुटून पडली. आम्ही तिथेच बसलेलो होतो. एका साईडला  मिठाई वाटप आणि दुसऱ्या  बाजूला बुफेची मांडणी चालली होती. मुलांना एकेक बॉक्स देऊन त्यांची रवानगी केली.  इतका वेळ आम्हाला वाटलं कि बुफे या मुलांसाठीच आहे परंतु तो फक्त मंत्री आणि इतर पाहुण्यांसाठी होता. तो  बॉक्स मिळवण्यासाठी मुलं भांडत बसली होती. वाटप करणारा मधेच मुलांवर ओरडत होता, त्यांना ढकलत होता.  एकदाचे ते  मिठाई वाटप संपले. काही मुलं उशिरा आली त्यांना पकडून आणून त्या वाटप करणार्याने बॉक्स त्यांच्या हातात दिले आणि म्हणाला "खा रे!! खेळाडूंनी खायचं असतं दणकून(मला तिथे जाऊन त्याला दोन दणकून द्याव्यास्या वाटल्या, पण त्यात त्याचा काही दोष नव्हता)!! खा रे! ! खा! !" एवढेसे खाल्यावर कसं परफॉर्म करणार?  प्रत्येकाला उत्सुकता होती या रंगबिरंगी बॉक्स  मध्ये काय असेल?? सभागृहाच्या बाहेरच्या कट्ट्यावर मुले बॉक्स खोलून खात बसली होती. त्यात काय होते तर दोन सामोसे, एक लाडू, एक फ्रुटी? सकाळपासून उपाशी असलेल्या मुलांसाठी(भावी खेळाडूंसाठी) फक्त एक  मिठाईचा बॉक्स? दुसर्याच बाजूला काही पाहुणे होते ज्यांना काही खाण्याची देखील इच्छा नव्हती तरी त्यांना जबरदस्तीने बॉक्स दिले जात होते आणि वरती जेवणाचे आमंत्रण देखील दिले जात होते. 

आपल्या देशात ज्याला खरंच अन्नाची गरज आहे त्यांना काही दिले जात नाही आणि जे खाऊन-पिऊन सुखी असतात त्यांनाच खाण्याचा आग्रह केला जातो. इतर देशात खेळाडूना चांगले खाणे आणि प्रशिक्षणहि दिले जाते त्यामुळे त्यांच्याकडे पदकांची संख्या वाढतच जाते.  ती मुले त्या एका बॉक्स वर खुश झाली, पण खेळाडूंना असंच खाणं मिळत राहिलं तर तुम्ही त्यांचाकडून पदकं मिळवण्याची अपेक्षा कशी करू शकता ???

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

No-Mobile-Phone Phobia




काल रविवार असल्याने आमच्या सगळ्या कंपू ला सुट्टी होती त्यामुळे भेटायचं ठरलं. खूप दिवसांनी भेटलं कि बरंच काही बोलायचं असतं. मुलांचं माहित नाही पण मुलींना खूप दिवसांनी असो किंवा दिवसातून खूप वेळा असो बोलायचा कधीच कंटाळा येत नाही. शॉपिंग, ज्वेलरी, बॉयफ्रेंड, सिनेमा… वगैरे वगैरे …  अशा नानाविध विषयांवर गप्पा चालू असतात. खुप दिवसांनी भेटणार असलो कि मैत्रीनींमध्ये मिरवायला (किंवा जेलस करायला) नविनातला नवीन ड्रेस, किंवा नुकतंच खरेदी केलेल्या गोष्टी घालायच्या असतात. आम्ही भेटलो 'हाय' 'हेलो' झालं, काय खायचं ते मागवलं. पण गप्पा मारायला भेटलेलो आम्ही आपापल्या मोबाईल मध्ये मग्न झालो.  वालपेपर, गाणी एकमेकांना 'सेंड' करत बसलो. कोणी काय ड्रेस घातलाय किंवा कोणी कुठली ज्वेलरी घातली याकडे कोणाचच लक्ष नव्हतं. सगळे फेसबुकवर फोटो अपलोड करण्यासाठी फोटो काढत बसले होते.….  काही एकमेकींचे….  काही मागवलेल्या खाण्याचे.… 



पूर्वी भेटलं कि कित्तेक विषयावर गप्पा व्हायच्या. आता प्रत्यक्ष भेटून गप्पा न होता 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात. सतत व्हाट्स अप चालू असतं. त्या दिवशी माझा एक मित्र म्हणतो तुझाशी कसं बोलणार तुझ्याकडे तर व्हाट्स अपच नाहिये. मी फक्त अशाच लोकांशी बोलतो ज्यांच्याकडे व्हाट्स अप, वी-चाट, लाईन आहे. मग त्याचावरून आमच्यात बराच वाद झाला. शेवटी वाद कोणाच्यातही असला तरी नेहमी मुलीच जिंकतात. आता तो स्वतःच मेसेज करतो, फोनही करतो कधीतरी. सांगायचा मुद्दा हा कि सध्या 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात, भेटून बोलायला कोणालाच वेळ नसतो. भेटलं तरी पूर्वीसारखं बोलणं होत नाहि. घरचे पण हेच बोलत असतात, काय आजकालची मुलं, नुसता त्या डबड्याला (मोबाईल) चिकटलेली असतात.

त्या दिवशीच्या रात्री असंच विचार करत बसले तेव्हा लक्षात आलं कि, एवढा वेळ सोबत होतो पण कुणी कोणता ड्रेस घातला होता, कुणी काय खाल्लं याकडे कोणाचं लक्षहि नव्हता. फक्त समोरासमोर असूनही व्हर्चुअली एकत्र होतो. सध्या भेटणं होतं ते फक्त मोबाईलचं! दिवसातून फक्त एकदाच नाही तर प्रत्येक क्षणाला, त्यामुळे तो थोडाजरी नजरेआड गेला तरी करमत नाही. मग तो जवळ असल्याचे भास व्हायला लागतात.


मोबाईल जवळ नसला कि शोधायचा, रिंग वाजत नसली तरी ती वाजतेय असे वाटलं, मेसेज आला नसला तरी मेसेज ची रिंग ऐकू यायला लागली कि समजायचा कि 'नोमोफोबिया' झालाय. नोमोफोबिया म्हणजे मोबाईल जवळ नसणे.  असं थोडंजरी तुमचा सोबत होत असेल तर जास्त घाबरायचा नाही. फक्त थोडसं मोबाइलला दूर ठेवायचं. जास्त मेसेज मेसेज खेळत नाही बसायचं. तसं हे थोडंसं नाही पण बरंचस कठीण आहे माहितेय मला. एखादी गोष्ट सलग २१ दिवस केली कि त्याची सवय लागते आणि एकदा सवय लागली, ती जास्त प्रमाणात केली कि त्याचं व्यसन लागतं… आणि व्यसन लागलं कि ते लवकर सोड म्हटलं तरी सुटत नाही … सध्या प्रत्येकालाच हे व्यसन लागलंय.

हा आवाज ??? अरे किती वेळ झालाय ……  माझा फोन वाजतोय यार ……. ! :P

गुरुवार, ११ जुलै, २०१३

गड आला पण सिंह गेला .. रिमझिम पाऊस, गरमागरम पिठलं-भाकरी आणि सिंहगडचा निसर्ग!

पुण्यातील गडप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी पावसाळा सुरू झाला की पहिली पसंती असते ती म्हणजे सिंहगड किल्ला. पुण्याच्या अगदी दक्षिणेला अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर वसलेला हा ऐतिहासिक किल्ला पावसाळ्यात एखाद्या स्वर्गासारखा सुंदर दिसतो. जर तुम्हाला विकेंडला खूप जास्त प्रवास न करता, निसर्गाचा आनंद घेत एक थरारक अनुभव घ्यायचा असेल, तर सिंहगडचा मान्सून ट्रेक हा सर्वोत्तम पर्याय आहे.



किल्ल्याचा गौरवशाली इतिहास माहिती आहे का ? सिंहगडचे मूळ नाव 'कोंढाणा' असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्याच्या सावलीत गेले. कोंढाणा किल्ल्याचा इतिहास म्हटला की, वीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या पराक्रमाची गाथा डोळ्यांसमोर उभी राहते. "गड आला पण सिंह गेला" हे शिवरायांचे उद्गार याच किल्ल्यासाठी होते. तानाजींच्या अतुलनीय शौर्यामुळेच या किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' ठेवण्यात आले. त्यामुळे हा ट्रेक केवळ एक निसर्गभ्रमंती नसून महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची अनुभूती देणारी एक सफर आहे.
हा ट्रेक शनिवार वाड्यापासून अंदाजे ३० किमी अंतरावर आहे. या ट्रेकची काठिण्य पातळी सोपी ते मध्यम आहे. ट्रेकचे एकूण अंतर पाहता, पायथ्यापासून म्हणजेच आटकरवाडीपासून गडावर जाण्यासाठी साधारण २.५ ते ३ किलोमीटर चालावे लागते. या प्रवासात गडावर चढण्यासाठी १.५ ते २ तास आणि गड उतरण्यासाठी १ ते १.५ तास इतका वेळ लागतो


प्रवास कसा करावा? (How to Reach)
पुण्यावरून स्वारगेट किंवा कात्रजवरून सिंहगड पायथ्यासाठी (धायरी, खडकवासला मार्गे) पीएमपीएमएल (PMPML) बस सेवा उपलब्ध आहे. जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने जात असाल, तर 'डोणजे' गावावरून डावीकडे वळून तुम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या आटकरवाडी (Atkarwadi) गावात पोहोचू शकता. येथूनच मुख्य ट्रेकिंगची वाट सुरू होते. ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी वरपर्यंत जाण्यासाठी पक्का घाट रस्ताही उपलब्ध आहे, जिथे ई-बस (E-Bus) किंवा खाजगी वाहनाने जाता येते. मात्र, पावसाळ्यात ट्रेकिंगचा खरा आनंद पायी चालण्यातच आहे.
पावसाळी ट्रेकचा थरारक अनुभव (The Trail Experience)
पावसाळ्यात सिंहगडचा परिसर हिरव्यागार शालूने वेढलेला असतो. खडकवासला धरणाचा परिसर पार करतानाच आजूबाजूचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते. आटकरवाडीतून सुरू होणारी पायवाट सुरुवातीला काहीशी चढणीची आहे. वाटेत लहान-मोठे पाण्याचे झरे आणि डोंगरउतारावरून वाहणारे छोटे धबधबे पाहायला मिळतात.


पावसाळ्यात गडावर सतत पाऊस आणि सोसाट्याचा वारा असतो. अनेकदा इतके दाट धुके असते की समोरील रस्ताही दिसत नाही. धुक्यातून वाट काढत, निसरड्या खडकांवरून सांभाळत चालण्याचा अनुभव अत्यंत थरारक असतो. गडाच्या अर्ध्या वाटेवर आल्यावर खाली खडकवासला धरणाचे विहंगम दृश्य दिसते. शेवटी ऐतिहासिक 'पुणे दरवाजा' पार करून आपण गडावर प्रवेश करतो. गडावर तानाजी मालुसरे यांचे स्मारक, देवटाके (गोड पाण्याचे टाके), कल्याण दरवाजा आणि दूरदर्शनचा टॉवर ही मुख्य आकर्षणे आहेत.





गडावरील झुणका-भाकरी आणि गरमागरम भजी- रानमेवा 
सिंहगडचा ट्रेक हा केवळ निसर्गासाठीच नाही, तर तिथल्या जेवणासाठीही प्रसिद्ध आहे. गडावर चढून गेल्यावर मिळणारी चुलीवरची गरमागरम पिठलं-भाकरी (झुणका-भाकरी), सोलकढी, कांदा भजी आणि मातीच्या मडक्यातील थंडगार दही खाणे हा एक वेगळाच आनंद असतो. ट्रेकचा सगळा थकवा या जेवणाने दूर होतो.


पावसाळ्यात पायवाटेवरील दगड अतिशय निसरडे होतात, त्यामुळे चांगल्या ग्रीपचे ट्रेकिंग शूज वापर करा. मुसळधार पावसात कधीकधी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. सिंहगड हे आपले ऐतिहासिक वैभव आहे, त्यामुळे गडावर प्लास्टिक किंवा कचरा कुठेही टाकू नका. सिंहगडचा मान्सून ट्रेक तुम्हाला ताजेतवाने करतो आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो. या पावसाळ्यात आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत सिंहगडला नक्की भेट द्या!
तुम्ही सिंहगडला सकाळी लवकर जायचा विचार करत आहात की विकेंडच्या गर्दीपासून वाचण्यासाठी निवांत वेळेत? 

मंगळवार, २ जुलै, २०१३

नेहमी मीच का ???


   'मी तिच्यावर एवढं प्रेम केलं तरी ती मला का नाही मिळाली...' नेहमी माझा बाबतीतंच असं का होतं? नेहमी मीच का? 'मी एवढा अभ्यास केला तरी एटीकेटी लागलीच, तिनी जास्त अभ्यास न करता, तिला फस्ट क्लास मिळाला...' माझासोबतच हे व्हायचं होतं का?... आपल्या कानावर पडणारी ही नित्याची वाक्ये ... काही झालं तरी नेहमी मीच का म्हणून? अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का?




  कधी निवांत क्षणी असा विचार केला ना कि लक्षात येतं कि, हा पडणारा प्रश्न नेहमी ताण-तणाव, विनोदी प्रसंग, लाज आणणार्या गोष्टी झाल्यावरच पडतो. जसे कि, ऑफिसमध्ये सगळ्यात चांगलं काम केलेलं असलं तरी, प्रोमोशन दुसरंच कोणाला तरी मिळणार. सुट्टीचा दिवस गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सोबत घालवायचा असेल तर नेमकं त्याच वेळी आईला घरच्या साफ-सफाई साठी तुम्ही हवे असता(इतर भाऊ-बहिण असतानादेखील) किंवा नेमकं तुमच्या खास मित्रांना तुम्हाला भेटायचं असतं. अशावेळी वाटतं हे माझासोबतच व्हायचं होतं. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्य बाबतीत देखील हेच, मी का म्हणून नेहमी लवकर यायचं आणि समोरच्याची वाट बघायची? दारुडे नवरे-सासुचा छळ सहन करण्यार्या सुना पण हेच म्हणतात. मीच का हा छळ सहन करायचा? भ्रष्टाचार करणारी नेतेमंडळी पकडले गेल्यानंतर देखील हेच म्हणत असणार, देशात इतर लोकसुध्दा भ्रष्टाचार करतात पण यांना पकडायला मीच बरा सापडलो? असे कितीतरी प्रसंग सांगता येतील जेव्हा आपल्या मेंदूत 'नेहमी मीच का? हा प्रश्न वळवळायला लागतो.

   कधी चांगली घटना घडल्यानंतर हा विचार केला का कि देवा हि चांगली घटना माझ्यासोबतच घडायची होती का? अनपेक्षित पणे निकाल चांगला लागला, अचानक लॉटरीचे तिकिट लागले, नोकरीत बढती मिळाली, आपल्याला आवडणारी मुलगी/मुलगा आपल्याशी आपण होऊन बोलायला आला, ऑफिस/कॉलेजला जाताना एकही सिग्नल लागला नाही अशावेळी आपण म्हणतो का, 'मीच का?' चांगलं झालं की कुणी त्याच्या नावाने ओरडत नाही पण वाईट काही झाले की नशीब आणि इतर सर्वांना त्यात सहभागी केलं जातं.

    हे जीवन सुंदर आहे, नेहमी नकारात्मक विचार करुन काहिच साध्य होत नाही. सकाळी लवकर मीच का उठावं हा प्रश्न डोक्यात आला कि विचार करा, काहि लोकांना तर दुसर्या दिवशीचा सूर्य देखील पाहता येत नाहि, झोपेतच ते जगाचा निरोप घेतात. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडची वाट पाहण्यात कसला आलाय मीपणा! विचार करा काहींना तर आपली आवडती व्यक्ती पण पटवता येत नाही. अभ्यासाचा कंटाळा आला तर त्यांचा विचार करा ज्यांना शिकण्याची इच्छा असूनदेखील भीक मागावी लागते. सिग्नल लागला तर लागु दे कि तुझ्या भल्यासाठीच तर आहे ना तो! वृध्द आई-वडिलांना मीच का म्हणून सांभाळायचं, विचार करा त्या लोकांचा ज्यांनी कधीच आपल्या आई-वडिलांचे तोंड देखील पाहिले नाहि. एखादी गोष्ट करायचा कंटाळा आला किंवा यासाठी मीच का हा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा नक्की त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा जी त्या गोष्टीपासून वंचित आहे, मग त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळेल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे 'Dont say WHY ME, say TRY ME.' हे जीवन जगण्यासाठी आहे. वर्तमानरुपी 'PRESENT' आहे, त्याचा हसतहसत स्वीकार करा. 

***






सोमवार, १ जुलै, २०१३

. . . कितना बदल गया इन्सान!!!




भाग-१

   पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा मानल्या जायच्या, याच गरजामध्ये आता मोबइल(स्मार्टफोन्स्), इंटरनेट, बाईक/कार यांचा समावेश होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर ब्रॅन्डेड, लक्झुरियस बाईक/कार सर्रास दिसतात. या वाहनांमुळे जिकडे तिकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक होते. ट्रॅफिक कितीही असले तरी काही मनमोहक कार नक्कीच आपले लक्ष वेधून घेतात.  अशा कार फक्त लक्षच वेधुन घेत नाहीत तर एखाद्याचे प्राणही हिरावून घेतात.

   मला लहानपणीपासून मांजर आणि कुत्री (फक्त पिल्लु) खूप आवडतात, त्यादिवशी झालं असं, मी बसस्टॉपवर बसची वाट पहात थांबले होते. एक छोटसं पपी अहो कुत्र्याच पिल्लु हो! अस 'क्युट'सं, काळ कुळकुळीत! ते असं लुटूलुटू रस्ता पार करत होतं. त्याच वेळी समोरुन एक मनमोहक कार येत होती. पपी ची दिरंगाई आणि ड्रायव्हर ची घाई या दोहोंचा मेळ बसला नाही आणि क्षणार्धात पिल्लु चा निष्प्राण देह समोर दिसला. कार तर केव्हाच हवेच्या वेगाने पसार झाली, मागे वळूनही न पाहता...

   अशा वेळी मनात विचार येतो, ते पिल्लु एवढुसं छोटुसं असला म्हणून काय झाल. जर त्या पिल्लु च्या जागेवर एखादा मनुष्य प्राणी असता तर लगेच लोक जमा झाले असते. पोलिस कम्प्लेन्ट केली असती आणि बरच काही.. तो पपी एक छोटासा प्राणी म्हणून त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. 

भाग- २ 

   केदारनाथला गेलेल्या भाविकांची झालेली दशा आणि त्या महाकाय संकटातून सहीसलामत परत आलेल्या नागरिकांचे अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया आपण वृत्तपत्रे आणि विविध वाहिन्यांच्या माध्यमातून पाहिल्या. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अशाच दोन कुटुंबियांना भेटण्याचा नुकताच् योग आला. एका डोळ्यातून आपल्या माणसांना भेटल्याचा आनंद तर दुसर्य़ा डोळ्यातून त्या कठिण प्रसंगात यमदुत समोर दिसत असताना इथून परत घरी जाऊ की नाही अशी अवस्था, असा दुहेरी मिलाप त्या पती-पत्नीच्या अश्रुंद्वारे दिसून येत होता. त्यांनी सांगीतलेल्या अनुभवामध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे; त्या संकटात ही मंडळी अडकली असताना तेथील नागरिकांनी यांना मदत करण्यऐवजी स्वःतचा फायदा करुन घेत होती. अतिववृष्टी मध्ये पावसापासुन आसरा देण्यासाठी यात्रेकरुंकडून पैसे हिसकावून घेत होती. काही लोक पैसे न दिल्यास त्यांना खाली ढकलून देत होती. भारताची संस्कृती आहे 'अतिथी देवो भवः'! दुसर्या राज्यातून आलेल्या भाविकांचि मदत करण्यऐवजी त्यांनाच लुटले जात होते. कुठे गेली माणसाची माणुसकी? जवानांच्या मदतीने ही मंडळी सहीसलामत घरी आली परंतु बाकी लोकांचे काय? 

अशा वेळी म्हणावसं वाटतं

देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!
सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!!


***

तुमचा मेंदू तुम्हाला फसवतोय? जाणून घ्या विचारांचा 'हाजीर तो वजीर' खेळ!

जे सहज आठवतं तेच खरं असतं का? (हा लेख तुमचे विचार बदलून टाकेल!) कधी कधी तुमच्या बाबतीत असे होते का? सकाळी सकाळी एखादी वाईट बातमी पाहता, अनुभ...