Sunday 7 March 2021

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहाणी झाली जी ती पूर्वीही होती आणि आजही आहे ... आत्त्ता फक्त फरक एवढाच आहे सगळे बंधन तोडून नव्हे तर ते सगळे सांभाळून सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेस.... रोज एक नव्हे आव्हान आहेच .. आई, बहीण, काकू, मावशी, मैत्रीण .. सर्वच नाती सांभाळत स्वतःकडे किती लक्ष देते ? .. संकटं कितीही येवो तरी सगळ्यांचा पाठीशी खंबीरपणे राहणारी तू ... प्रत्येक क्षणात ना डगमगता सगळ्यांना सावरून घेणारी तू ... कोणी तुला हे सांगू अथवा नको सांगू ... तू आजही कणखर आहेस कालही होती आणि उद्याही राहणार... रोजचाच दिवस आपला आहे 😜 तरीसुद्धा आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐 🥳🥳💃💃

#womansday #जागतिकमहिलादिन

Monday 1 June 2020

Smile ! Its free therapy ... :)

Have you ever realized or felt that we are living two lives? One is that everybody sees. Where everybody compares their life with yours and thinks yours is so awesome, exciting, and adventurous. You are having so much fun. You have achieved everything, and you are happy with your life... Bole to life ekdum set. 
And there is a second one where nobody knows what you are feeling deep inside your heart. There is so much pain that you can't share it with anybody because nobody understands. You wanted to share it with somebody, but no! You don't want to hurt anybody, so you keep that thing deep inside. And day by day, you got used to it. And staying happy or smiling all the time becomes your habit. Still in your heart, you are juggling these two lives, and nobody will understand it. 

Monday 23 March 2020

Me Time


कामाच्या व्यापामध्ये आपण स्वतःला किती अडकवून घेतो ना ...खुप दिवसांनी ब्लॉग लिहायचा मूड आलाय... विषय खूप असतात, विचार हि खूप येतात डोक्यात... पण तो मांडायला वेळ नसतो(जो असतो खूप...  पण आपण कधी काढत नाही :P) सो ... सध्या वेळ खूप आहे...  घरात बसून करायचं काय??? बाहेर पडता येत नाही, कोणाला भेटता येत नाही......  वर्षभरानंतर मी काल माझ्या एका जुन्या मैत्रिणीला भेटले. तिनेही स्वतःला कामात  खूप अडकून घेतलेल ... म्हणजे श्वास घ्यायलाहि वेळ नाही अगदी तसं ... फायनली आम्हाला भेटायला वेळ मिळाला आणि आम्ही भेटलो. एवढ्या कालावधीने भेटल्यानंतर वेळेचं भान नसतं ... इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर मी तिला विचारलं

मी : तू एवढी का बीजी झालीये तुला वेळच नसतो ??? ना बोलायला ना भेटायला ... 
ती : वेळ काढून करू काय ??? 
मी : अगं ... दिवसभरात कितीही बिझी असलं तरी स्वतःसाठी वेळ (ME  TIME )काढायला पाहिजे ना 
ती : आणि त्या मी टाईम मध्ये काय करायचं ??? 
मी : स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या :)
ती : म्हणजे नक्की काय ??? मी जेव्हा माझं काम करते तेच माझ्यासाठी मी टाईम असतो 
मी : या 'मी टाईम' मध्ये तुम्ही या गोष्टी करू शकता

झोप काढा - झोप तर आपण रोजच काढतो, पण कधी स्वतःला रिलॅक्स केल आहे का? ? कामाच्या व्यापामध्ये रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं या रुटीन लाईफ मध्ये झोपेकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा विकेंड येतो तेव्हा बराचसा वेळ आठवड्याची पेंडिंग काम संपवण्यात जातात. तर या मी टाइम मध्ये छानशी झोप काढू शकता आणि ताण तणावापासून मुक्ती मिळवू शकता. 

स्वतःला पॅम्पर करा : यासाठी घराबाहेर पार्लरलाच जायला पाहिजे असं काही नाही. छानपैकी स्वतःला हेड मसाज देऊ शकता, नेल आर्ट करू शकता, मेकअप करू शकता, विंग आय लायनरची प्रॅक्टिस करू शकता :P (बिग टास्क), आपल्याकडे असणाऱ्या ज्वेलरीस चे कलेक्शन स्वतःवर ट्राय करू शकता, एखादी हटके हेअर स्टाईल करून बघायची. एखादे युट्युब मेकअप ट्यूटोरील स्वतः करून बघायचे आणि सगळ्यात महत्वाचे स्वतःवर प्रेम करायचे <3
                                 . 

स्वत:चे फोटो काढा - बऱ्याचदा लोकांची ओरड असते माझे फोटोज चांगले नाही येत, तु किती फोटोजेनिक आहेस, तुझे फोटो नेहमी चांगले येतात. माझे पण फोटो काढत जा ना असे. कधी स्वत:ला टाईम दिलाय का ?? आपले फोटो छान कसे येतील याचा विचार केला का ? स्मार्टफोन तर सगळ्यांकडे आहेत मग स्वतःचे किती फोटो काढता ? 

आपला छंद जोपासा - आपल्या प्रत्येकाला एकतरी छंद असतो, गाणी ऐकणे, डिझाईन्स/डूडल्स/ कॅलिग्राफी/पेंटिंग/ स्केचिंग, काहींना जिम ला जाऊन वेळ घालवायला आवडते, एखादं वाद्य वाजवायला शिकावे, फोटोग्राफी, मनातले विचार डायरी मध्ये लिहा, बागकाम करा, पुस्तक वाचा, डान्स करा, घ्या एखादा तरी छंद लावून, कुठेतरी आतमध्ये दडलेला असेल काढा त्याला बाहेर. छंदातून मिळणारा आनंद दुसरा कोणी देऊ नाही शकत. 



प्रत्येकाला दिवसाला २४ तास मिळतात आणि त्या २४ तासातले आपण फक्त स्वतःसाठी किती वेळ देतो ?? मग ते पाच मिनिट असो अथवा पाच तास. यावरूनच कळते आपण स्वतःवर किती प्रेम करतो. दुसऱ्यावर तर कोणीही प्रेम करेल आधी स्वतःवर प्रेम करा बाकीचे आपोआप तुमच्यावर प्रेम करतील.

 मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी या आणि अजूनही बाकी काही गोष्टी करत असते ज्या यामध्ये टाकलेल्या नाही. या फक्त घरात बसून करण्यासारख्या आहेत. बाकी बाहेर पडून तर स्वतःसाठी अजून हि बरंच काही करू शकतो. तुम्ही काय करता तुमच्या 'मी टाईम ' मध्ये??? का फक्त बोर होत बसता ?? आणि कामाच्या वेळी म्हणता .. मला वेळ मिळाला असता तर मी हे केलं असतं  मी ते केलं असतं ??? अजून काही आयडियास असतील तर कमेंट मध्ये टाकू शकता :) हॅप्पी 'मी टाईम' :




Thursday 19 March 2020

#sunkissed

... सकाळी सकाळी ऊन्हात बसण्याची मजा काही औरच असते .. सध्या असलं काही होत नाही.. सकाळी लवकर उठा... पटापट आवरा.. डबा करा डबा भरा .. ऑफिस ला जा.. एसी मध्ये बसा ... जमलं तर लंच ल बाहेर पडा... तेवढ्या कालावधीत जेवढं काही ऊन मिळेल तेच काहीस... बाकी ऊन्हाशी आपला जास्त काही संबंध येत नाही ... पण हे सकाळचं ऊन मस्तच असतं .. असं भारी वाटतं .. .. गॅलरी मध्ये आपल्या झोक्यावर बसायचं आणि चहा/कॉफी सोबत छानपैकी एखादं पुस्तक वाचायला घ्यायचं... किंवा मस्तपैकी गुलजार ची गाणी लावून ऐकत बसायचं.. झालं ना मग अशी सकाळ कोणाला नकोय ... सुट्टीच्या दिवशी सकाळी लोळत बसण्यापेक्षा असलं काहीतरी भारी वाटतं... आणि ते #sunkissed वगैरे वगैरे

Sunday 29 December 2019

''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' - The Power Game



खूप दिवसांपासून अमृता-प्रभाकर चे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक पाहायचे होते पण वेळ मिळत नाही, दूर आहे, पुढच्या वेळी येते अशी वेगवेगळी कारण देत आज तो योग आला. आपल्या मित्र-मैत्रिणींना पहिल्यांदाच रंगमंचावर अभिनय करताना बघतानाचा आनंद काही वेगळाच असतो. आवाज, वेशभूषा, अभिनय, सगळंच भारावून टाकणारं. निशाला आपलं प्यादं बनवून हवं तसं नाचवता येण्यासाठी, आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी तिचा हवा तसा शारीरिक आणि मानसिक उपभोग घेण्यासाठी मुग्धाची खेळी म्हणजेच  ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक म्हणजे लहानपणापासून वेश्यावस्तीत वाढलेला रघु(प्रभाकर पवार), गावाकडून आलेली, आयटी विभागात काम करत गावाकडचं कुटुंब सांभाळणारी निशा(सुजाता कांबळे) आणि वकिली क्षेत्रात आपला ठसा उमठवलेली आपल्याला हवं ते आणि तेही कुठल्याही परिस्थितीत मिळवणारी 'पॉवर वुमन' मुग्धाची(अमृता ओंबळे ) कहाणी.  वेश्यावस्तीत वाढल्यामुळे तिथल्या समस्या, तिथल्या महिलांचे होणारे शारीरिक शोषण रघु जवळून पाहत आल्याने तिथल्या जास्तीत जास्त महिलांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून तो धडपडतो आहे. दुसरीकडे निशा जी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या हेतूने आपले गावचे घर सोडून शहरात आली आहे.  पैसे कमावण्याच्या नादात ती समलैंगिक वासनेच्या  वेगळ्याच भोवरयात सापडली आहे. रघूच्या येण्याने आपल्यावर होत असलेला समलैंगिक छळ आणि त्यातून रघुवरील प्रेम आणि त्याशिवाय आपल्याला कोणी बाहेर काढू शकनार नाही हा आत्मविशास. या प्रेम कहाणी मध्ये एक स्त्री असूनही जिला स्त्री देह उपभोगायची चटक लागलेली आहे आणि जी शेवट पर्यंत पुरुष जातीचा तिरस्कार करत आपल्याकडील पाॅवर्स चा गैरउपयोग करणारी मुग्धा. 


 

हे नाटक प्रत्यक्ष बघण्यात जे थ्रिल आहे ते इथे सांगण्यात नाही. कारण हे नाटक आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असले तरीही आपण या नाटकात अप्रत्यक्षरीत्या जोडले जातो. नाटक संपल्यावर काही गोष्टी आपल्या मेंदूत गुणगुणत राहतात.अतिशय संवेदनशील असा समलैंगिकतेचा विषय हाताळत असतानाच दुसरीकडे सगळेच पुरुष एक सारखे नसतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. निशाची होणारी घुसमट अंगावर येते. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी निशा असतील ज्या अशा शारीरिक छळाच्या शिकार असतील. इच्छा असूनही या गर्तेतून बाहेर पडता येत नाही.  माणूस पॉवर चा उपयोग करून कोणत्याही थराला जाऊ शकतो का ? आपलं सोशल स्टेटस जपण्यासाठी आपण लेस्बियन आहोत हे जगापासून लपवून ठेवतो? आपल्याला हवं तसं जगता येण्यासाठी मग त्यात कोणाचाही बळी गेलेला चालतो ? कुठेतरी विचार करायला लावणारं, काहीतरी खटकतंय, सुन्न करनारं आणि डोक्याला झिणझिण्या आणणारं नाटक म्हणजे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''.



Friday 1 March 2019

तुला कळणार नाही .....


संसार गाडा !!! एकट्याचा कि दोघांचा ??  मी रोज एकटीनेच ओढायचा का??  तू सकाळी उठणार राजेशाही थाटाने ... मी आपली सकाळी 5 लाच उठलेली ... मुलांचं सगळं आवरा आवरी करा ... त्यांच्या उठण्या पासून ते आंघोळी, नाष्टा, शाळेचा डबा ते त्यांना रिक्षात सू पर्यंत सगळंच करा... तू आपलं आरामात उठणार ... चहा दे गं ... मग तो पेपर हातात घेत ... वाचतो कि नुसतच बघतो .. तुझं  तुलाच माहित .... तासभर ते पेपर-चहा प्रकरण झालं कि ... तुझ्या अंघोळीसाठी पाणी पण मीच काढून द्यायच ... तुझं शर्ट इस्त्री करूनही मीच ठेवायचा ... माझी इकडे तारेवरची कसरत तुला कधी कळलीच नाही ...तुझ्यासाठी डब्बा करा तो हि मीच भरून द्यायचा ... तू आरामात तुझं आवरणार... डब्बा उचलणार .. गाडी ला किक मारून गेला ऑफिसला ... माझ्या ऑफिस च काय ??? मीही  नोकरी करतेच ना... तू गेल्यावर मी माझा सगळं आवरून हाताला लागेल तो ड्रेस घालून बाहेर पडणार ... दिवसभर ऑफिस च काम ... त्यातही डोक्यात विचार .. संध्याकाळी भाजी काय करायची ?? .. पोरांच्या डब्ब्याला उद्या काय करायचा?? .. मधेच कामाच्या डेडलाईन्स ... लंच ब्रेक मधे ऑफिस च्या मैत्रिणी त्यांचे किस्से सांगणार .. आज सासर्यांनी पोरांना शाळेत सोडल ... सासूबाई नी हे केला ते केल ... नवऱ्याने हे केल...  आपल्याकडे तर तो पण पर्याय  नाही ... ते दोघही गावाकडे ... आपल चौकोनी कुटुंब ... घरात चार टोकाला चार जन ... संध्याकाळी ऑफिसमधून कधी एकदा निघेल असं विचार करत निघते ... गाडी जसा वेग घेते तस विचारचक्र सुरु .. जाताना भाजी घ्यायची ... लाईट बिल तुला भरायला सांगितलं होतं ... सिलेंडर बुक करायला लावला होता तुला ... गेल्यावर मुलांचा अभ्यास ... नानाविध विचार ... घरी पोहचते तर तू आधीच आलेला ... टीवी आणि तू ... मुलं गेम्स खेळण्यात व्यग्र .... पर्स ठेवून मी कामाला लागलेली ...तुला दिलेल्या कामाची आठवण करून दिली .. नेहमीप्रमाणे तू विसरलेला .... जेवण वाढून घ्यायला पण तुझी मदत नाही ... तू आणि टीवी मग्न .... जेवणानंतर मुलांचा अभ्यासही मीच घ्यायचा .... मग तू आणि मोबाइल ... स्वयंपाकघरातील आवाराआवर .... तुला बोलायला वेळ नाही माझाशी ... तू झोपून गेलेला.... पुन्हा नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात आणि पुन्हा तेच चक्रव्यूह ...थोड्याश्या अपेक्षा असतात ... सकाळच्या कामात थोडीशी मदत ... सगळच नाही पण जमेल ते काम दोघ मिळून करू ... रात्री स्वयंपाकघरात थोडी मदत ... दिवस कसा गेला एवढा जरी विचारला ना तरी खूप होत रे ... खूप धावपळ होतीये रे माझी .. एकसाथ 2 मुलांना सांभाळणं आणि त्यात तू एक तिसर्या मुलासारखं वागतो ... कधीतरी कौतुकाची अपेक्षा मलाही असते ... आपण दोघही एकाच वयाचे .... तुला जसं जगावं वाटत असेल तसं मलाही वाटत असेल ना???.. 


लक्ष दे तिच्याकडे ... तुला काय वाटेल या विचारात ती तिला काय वाटते हे ती कधी व्यक्त होईल कि नाही माहित नाही ...

Sunday 20 May 2018

Turning 30!!!

''टर्निंग ३० वगैरे '' ! ! ! 

वाढदिवस!! दरवर्षी येणारा दिवस!! “नेमेची येतो वाढदिवस”!! काहींना फार कौतुक असतं या दिवसाचं.. एक महिना आधीपासून ते वाढदिवस होऊपर्यंत लोकांना आठवण करून देत राहतात ... मला हे गिफ्ट द्या, ते गिफ्ट द्या! आणि काहींना अजिबातच कौतुक नसतं, तो  दिवस कधी आला आणि कधी गेला कळत पण नाही, त्यांच्या दृष्टीने एवढा काय असत त्या वाढदिवसात? दरवर्षी येतो आणि एक वर्ष कमी करून जातो. पण प्रत्येकाची आठवण, साठवण, प्लानिंग वेगवेगळ असतं. वाढदिवस झाल्यावर एक वर्ष कमी होतं कि वाढतं?? २० मधून २१ मध्ये जातो २९ मधून ३० मध्ये जातो. एका अर्थाने वाढतोच, असं मला वाटतं. काही म्हणतात १ वर्ष कमी होत जात, जर आपल्याला माहितीच नाही आपण किती वर्ष जगणार मग आपण त्या वर्षातून कमी कसं करणार . .. असो .. लॉजिक प्रत्येकाचं वेगळंच असतं प्रत्येक गोष्टीत.

सो.... हा वाढदिवस माझ्यासाठी जरा खास आहे... कारण २९ मधून ३० मध्ये जाणार .. म्हणजे सो कॉल्ड ‘टर्निंग ३०’ वगैरे .. हा जो ३० आकडा आहे ना, यामागे बरीच गणितं लपलेली असतात. मुलींसाठी “काय गं कितवा वाढदिवस?” “३० ची झाली तू ?” “अजून लग्न नाही झालं?” “कुणी बॉयफ्रेंड नाही का?” “किती उशीर?” “हल्ली या करियर ओरीयेन्तेड मुलींचं असंच असतं, नकोच म्हणतात लग्नाला” “एकट कसं राहणार?  “तुझा वयाची मुली बघ, त्यांना मुलं झाली बघ” पण या सगळ्यात तुम्हाला कुणी असं नाही म्हणत “काय गं कुठल्या पदावर आता?” “इतक्या कमी वयात खूप काही अचीव केला गं” “किती इनडिपेंडेंत झालीये तू?” “सगळं कस एकट हेंडल करते” “घरासोबत बाकी गोष्टी सुद्धा व्यवस्थित निभावून नेतेस”.. “किती मेंटेन केलंय स्वत:ला ३० वगैरे अजिबातच वाटत नाही”.....

३० हा आकडा आपल्या आयुष्याचा सुवर्णमध्य असतो. तुम्ही मच्युअर वगैरे झालेला असता. बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतात. कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचा, किती इमोशनल राहायच, म्हणजे बऱ्याच जणांच आयुष्य “सेट” झालेलं असतं. नोकरी, घर, गाडी सगळं बर्यापैकी मिळून गेलेलं असतं. आयुष्यात काय करायचा आणि काय करायचा राहिलंय ते कळत असतं. काही जन तर ३० पर्यंत सगळं आयुष्य जगलेले असतात. ३० क्रॉस केलेले मला तर २-३ जन असं पण म्हटले “बास झालं यार, सगळं करून झालं, काही राहिलच नाही आयुष्यात असं जे करायचा आहे. मी ठरवलेल्या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि बऱ्याच बाकी आहेत. आकड्यानुसार अर्ध आयुष्य संपलं पण मला मी तिशीत गेलीये असं अजिबातच वाटत नाही. “अभी तो  मैं जवान हूं!” असलं फिलिंग आहे.    

सगळ्यांना समोरच्याचं आयुष्य खूप सुंदर वाटतं आणि आपलं किती बोर चाललंय असं वाटतं. पण असं नसतं! आय टी मधल्या माझ्या मित्र-मैत्रीणीना बघितला कि वाटतं, ऐश आहे यांची ५ दिवस काम करायचा मस्त, आणि शनिवार-रविवार बाहेर फिरून यायचा. पण असं काही नसत! त्यांना माझं काम जास्ती एक्सायटिंग वाटतं, सारखं इकडे तिकडे फिरणं .. कधी कधी सेलिब्रिटी सोबत फिरणं फोटो काढणं. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आपापल्या वेळेनुसार मिळत असते. माझ्या कॉलेज मधल्या बऱ्याच मैत्रिणी लग्न होऊन परदेशात सेटल झाल्या आहेत. त्यांना बघितला कि आपल्या ३० च्या आत करायचा गोष्टी मधली हि गोष्ट राहून गेली आहे हि खंत वाटते, बट कोई नहीं, नेक्स्ट बड्डे इन फॉरेन. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ असतं उगीच दुसर्यांशी तुलना करून त्याची जगण्याची मजा कमी नको करायला. प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं आणि हटके करायचा. आपण बकेट लिस्ट बनवतो ना, काही लोक सगळ्यांना सांगत सुटतात आणि काही लोक मनात ठेवतात आणि हळूहळू एक एक गोष्ट करत राहतात.....

आपण ३० चे झालो म्हणजे आपण म्हातारे झालो किंवा आपल्याला आता काही करता येणार नाही. आपल्या वयाला हे शोभेल का? लोक काय म्हणतील? आपल्या वयाच्या मुला-मुलींची लग्न झाली. त्यांना मुल-मुली झाल्या आपलं अजून कशातच काही नाही. असं वाटून घ्यायची काही गरज नाही. कारण हीच लग्न झालेली लोक तुझी मज्जा आहे बाबा, नको लग्नाच्या भानगडीत पडू वगैरे म्हणतात. त्यांना आपलं आयुष्य भारी वाटतं आणि आपल्याला त्याचं आयुष्य भारी वाटतं.....

सो जुलिया लोईझा ने म्हटल्या प्रमाणे "I know people who graduated college at 21, and didn't get a salary job until they were 27. I know people who graduated at 25 and already had a salary job. I know people who have children and are single. I know people who are married and had to wait 8-10 years to be parents. I know people who are in a relationship and love someone else. I know people who love each other and aren't together. There are people waiting to love and be loved. My point is, everything in life happens according to our time, our clock. You may look at your friends and some may seem to be ahead or behind you, but they're not. They're living according to the pace of their clock, so be patient. You're not falling behind, it's just not your time." - Julissa Loaiza




टर्निंग ३० असो अथवा टर्निंग ४०” आपलं आयुष्य, आपल्याला हवं तसं जगावं! शेवटी काय लाईफ एकदाच मिळते, आणि ज्या गोष्टीने आनंद मिळेल ती गोष्ट तर नक्कीच केली पाहिजे. नाही का

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...