ब्रेक-अप.....
'जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्कील पड जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवाब,
'जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्कील पड जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवाब,
ना कोई है, ना कोई था, जिंदगी में तुम्हारे सिवा, ओ हमनवाब'....
मी हे गाणं ऐकत होते तेवढ्यात 'ती' मला भेटायला आली. पण तेव्हा ती
नेहमीप्रमाणे नव्हती. नेहमीप्रमाणे म्हणजे सदा हसतमुख, चॅपॅड चॅपॅड गप्पा मारणारी, नॉन स्टॉप
कुठल्याही विषयावर भाषण देणारी, नवीन फिल्म यायच्या
आधीच तिच प्रोमोशन करणारी, रोज स्वत:विषयी भरभरून बोलणारी; आज एकदमच
शांत शांत होती. मग खूप विचारल्यावर बोलली 'फाइनली
आमच चार वेळा ब्रेकअप-पॅचअप झल्यानंतर आता पुन्हा ब्रेकअप झालं आणि हे आता 'दि एण्ड' वाल ब्रेक अप झाल..... इत्यादी'. मला थोड्यावेळ असा वाटलं मी 'जब वी
मेट' मधली 'गीत' आहे, जी सगळ्यांच 'सॅड'गीत ऐकत असते आणि 'सोल्यूशन' देत बसते. मी तिला सांगून टाकल 'गेला ना सोडून जाउदेत तू चिल मार ना, कशाला
टेन्शन घ्यायचं, मस्त ए जवानी है दिवानी पाहून ये. असा सुतकी चेहरा करून बसलीस ना तर
त्याला जास्त आनंद होईल. तू दाखवून दे, मला माझं आयुष्य आहे आणि ते मी आनंदाने
जगनारच!....इत्यादी'
मला हा प्रश्न नेहमी पडतो, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ती आहे तस
स्वीकारलेलं असतं, तर हा 'ब्रेक-अप' नामक कीडा असा कसा या नाजूक नात्यात घुसून त्याला पोकळ करतो. एखाद्या व्यक्तीशी
आपण मानसिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या एकत्र आलेलो असताना ही 'ब्रेक-अप' ची फॅशन का मधे मधे करते. जन्म झाल्यानंतर
आपण आई, वडिल, भाऊ, बहीण ... विविध नात्यांनी आपोआपच बांधले जातो. रक्ताची नाती
म्हणतात त्याला. या नात्यांप्रमाणेच 'त्याच अन् तिच' नातं का होऊ शकत नाही? आई-वडिलांशी, भावा-बहिणीशी भांडण झालं की आपण त्यांचाशी ब्रेक-अप तर नाही ना
करत, मग इथेच का ब्रेक-अप करतात ही लोक? रिलेशनशिप सुरू करताना समोरच्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आवडत असतात(आवडत
असल्याचा उगीचच आव आणला जातो). सगळंच सुरुवातीला
आलबेल असतं. हळूहळू कळायला लागतं, आपल्याच्याने नाही झेपणार समोरची व्यक्ती आणि मग खटके उडतात. भांडण
होतात अन् मग ब्रेक-अप होत. समोरच्या व्यक्तीला ती आहे तसं स्वीकारलं की असलं ब्रेक-अप वगैरेचा पर्यायच नाही राहत.
काल अचानक मला 'ती'ची आठवण
आली म्हणून तिला फोन केला. इकडची तिकडची हालहवा विचारून झाल्यावर, तिनेच सांगायला सुरूवात केली. 'ती' आता पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. आणि आत्ताचा 'तो' तिला "हवा तसा" (अगदी परफेक्ट) आहे. बरीच खुश होती ती. मी फोन ठेवला. म्हटलं चला खुश आहे ना ती(?) मग ठिके! आणि मी कॉफी बनवत बनवत गुणगुणत बसले .....
'दिल संभल जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू,
दिल यहीं रुक जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू!!! ❤❤❤
Zakkas :)
ReplyDeleteKyaa baat.. Dil pe lagi to baat bani..
ReplyDeleteThankss Shai n champ :D
ReplyDelete