तू मी अन् पाऊस ...
आज तुझी आठवण यायला लागली ख़ुप;
पाहुन तुला समोर मला झाला आनंद;
नकळत माझ्या धरला तु माझा हात;
कणीस ख़ाताना आला जरा तुला लळा;
तु, मी, बाईक अन् सोबत होता पाऊस;
भिजता भिजता पावसात झाली आपली मस्त 'राईड';
असाच पाऊस रोज रोज येऊ दे;
आज तुझी आठवण यायला लागली ख़ुप;
म्हणून भेटायला आले विसरुन सारी तहान भूक,
पाहुन तुला समोर मला झाला आनंद;
पाऊस होता सोबत म्हणून मन
झाले बेधुंद,
नकळत माझ्या धरला तु माझा हात;
म्हटला चल खाऊ कणीस एकसाथ,
कणीस ख़ाताना आला जरा तुला लळा;
काकांना म्हटलं कणसात
थोड लिंबू तरी पिळा,
तु, मी, बाईक अन् सोबत होता पाऊस;
म्हणून भिजायची फिटली
पुरेपुर हौस,
भिजता भिजता पावसात झाली आपली मस्त 'राईड';
आता रात्री सर्दि, पडशासाठी
आई करेल 'गाईड',
असाच पाऊस रोज रोज येऊ दे;
तुझी माझी भेट रोज रोज घडू
दे.
***
No comments:
Post a Comment