शुक्रवार, २२ जुलै, २०१६
10- 12 days without (SMART)phone
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३
Sports Reality .. खोला बॉक्स… निकला सामोसा …

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३
No-Mobile-Phone Phobia
काल रविवार असल्याने आमच्या सगळ्या कंपू ला सुट्टी होती त्यामुळे भेटायचं ठरलं. खूप दिवसांनी भेटलं कि बरंच काही बोलायचं असतं. मुलांचं माहित नाही पण मुलींना खूप दिवसांनी असो किंवा दिवसातून खूप वेळा असो बोलायचा कधीच कंटाळा येत नाही. शॉपिंग, ज्वेलरी, बॉयफ्रेंड, सिनेमा… वगैरे वगैरे … अशा नानाविध विषयांवर गप्पा चालू असतात. खुप दिवसांनी भेटणार असलो कि मैत्रीनींमध्ये मिरवायला (किंवा जेलस करायला) नविनातला नवीन ड्रेस, किंवा नुकतंच खरेदी केलेल्या गोष्टी घालायच्या असतात. आम्ही भेटलो 'हाय' 'हेलो' झालं, काय खायचं ते मागवलं. पण गप्पा मारायला भेटलेलो आम्ही आपापल्या मोबाईल मध्ये मग्न झालो. वालपेपर, गाणी एकमेकांना 'सेंड' करत बसलो. कोणी काय ड्रेस घातलाय किंवा कोणी कुठली ज्वेलरी घातली याकडे कोणाचच लक्ष नव्हतं. सगळे फेसबुकवर फोटो अपलोड करण्यासाठी फोटो काढत बसले होते.…. काही एकमेकींचे…. काही मागवलेल्या खाण्याचे.…
पूर्वी भेटलं कि कित्तेक विषयावर गप्पा व्हायच्या. आता प्रत्यक्ष भेटून गप्पा न होता 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात. सतत व्हाट्स अप चालू असतं. त्या दिवशी माझा एक मित्र म्हणतो तुझाशी कसं बोलणार तुझ्याकडे तर व्हाट्स अपच नाहिये. मी फक्त अशाच लोकांशी बोलतो ज्यांच्याकडे व्हाट्स अप, वी-चाट, लाईन आहे. मग त्याचावरून आमच्यात बराच वाद झाला. शेवटी वाद कोणाच्यातही असला तरी नेहमी मुलीच जिंकतात. आता तो स्वतःच मेसेज करतो, फोनही करतो कधीतरी. सांगायचा मुद्दा हा कि सध्या 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात, भेटून बोलायला कोणालाच वेळ नसतो. भेटलं तरी पूर्वीसारखं बोलणं होत नाहि. घरचे पण हेच बोलत असतात, काय आजकालची मुलं, नुसता त्या डबड्याला (मोबाईल) चिकटलेली असतात.
त्या दिवशीच्या रात्री असंच विचार करत बसले तेव्हा लक्षात आलं कि, एवढा वेळ सोबत होतो पण कुणी कोणता ड्रेस घातला होता, कुणी काय खाल्लं याकडे कोणाचं लक्षहि नव्हता. फक्त समोरासमोर असूनही व्हर्चुअली एकत्र होतो. सध्या भेटणं होतं ते फक्त मोबाईलचं! दिवसातून फक्त एकदाच नाही तर प्रत्येक क्षणाला, त्यामुळे तो थोडाजरी नजरेआड गेला तरी करमत नाही. मग तो जवळ असल्याचे भास व्हायला लागतात.
मोबाईल जवळ नसला कि शोधायचा, रिंग वाजत नसली तरी ती वाजतेय असे वाटलं, मेसेज आला नसला तरी मेसेज ची रिंग ऐकू यायला लागली कि समजायचा कि 'नोमोफोबिया' झालाय. नोमोफोबिया म्हणजे मोबाईल जवळ नसणे. असं थोडंजरी तुमचा सोबत होत असेल तर जास्त घाबरायचा नाही. फक्त थोडसं मोबाइलला दूर ठेवायचं. जास्त मेसेज मेसेज खेळत नाही बसायचं. तसं हे थोडंसं नाही पण बरंचस कठीण आहे माहितेय मला. एखादी गोष्ट सलग २१ दिवस केली कि त्याची सवय लागते आणि एकदा सवय लागली, ती जास्त प्रमाणात केली कि त्याचं व्यसन लागतं… आणि व्यसन लागलं कि ते लवकर सोड म्हटलं तरी सुटत नाही … सध्या प्रत्येकालाच हे व्यसन लागलंय.
हा आवाज ??? अरे किती वेळ झालाय …… माझा फोन वाजतोय यार ……. ! :P
मंगळवार, २ जुलै, २०१३
नेहमी मीच का ???
सोमवार, १ जुलै, २०१३
. . . कितना बदल गया इन्सान!!!
पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा मानल्या जायच्या, याच गरजामध्ये आता मोबइल(स्मार्टफोन्स्), इंटरनेट, बाईक/कार यांचा समावेश होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर ब्रॅन्डेड, लक्झुरियस बाईक/कार सर्रास दिसतात. या वाहनांमुळे जिकडे तिकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक होते. ट्रॅफिक कितीही असले तरी काही मनमोहक कार नक्कीच आपले लक्ष वेधून घेतात. अशा कार फक्त लक्षच वेधुन घेत नाहीत तर एखाद्याचे प्राणही हिरावून घेतात.
भाग- २
केदारनाथला गेलेल्या भाविकांची झालेली दशा आणि त्या महाकाय संकटातून सहीसलामत परत आलेल्या नागरिकांचे अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया आपण वृत्तपत्रे आणि विविध वाहिन्यांच्या माध्यमातून पाहिल्या. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अशाच दोन कुटुंबियांना भेटण्याचा नुकताच् योग आला. एका डोळ्यातून आपल्या माणसांना भेटल्याचा आनंद तर दुसर्य़ा डोळ्यातून त्या कठिण प्रसंगात यमदुत समोर दिसत असताना इथून परत घरी जाऊ की नाही अशी अवस्था, असा दुहेरी मिलाप त्या पती-पत्नीच्या अश्रुंद्वारे दिसून येत होता. त्यांनी सांगीतलेल्या अनुभवामध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे; त्या संकटात ही मंडळी अडकली असताना तेथील नागरिकांनी यांना मदत करण्यऐवजी स्वःतचा फायदा करुन घेत होती. अतिववृष्टी मध्ये पावसापासुन आसरा देण्यासाठी यात्रेकरुंकडून पैसे हिसकावून घेत होती. काही लोक पैसे न दिल्यास त्यांना खाली ढकलून देत होती. भारताची संस्कृती आहे 'अतिथी देवो भवः'! दुसर्या राज्यातून आलेल्या भाविकांचि मदत करण्यऐवजी त्यांनाच लुटले जात होते. कुठे गेली माणसाची माणुसकी? जवानांच्या मदतीने ही मंडळी सहीसलामत घरी आली परंतु बाकी लोकांचे काय?
रविवार, ३० जून, २०१३
Monsoon Memories
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणांत येते सर सर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे ...
शाळेत असताना 'पावसाळा'
या विषयावर निबंध लिहिताना मी
नेहमी बाल कवींच्या कवितेतील या ओळींनी निबंधाची सुरुवात करायचे. पाऊस ही अशी गोष्ट आहे जी
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तो
सर्वांनाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाची पाऊस 'एन्जॉय' करण्याची पध्द्त वेगवेगळी असली तरी तो
आला की सगळेच आनंदुन जातात. पुर्वी लहान मुले पावसात
होड्या सोडत बसायचे पण सध्या होड्या कमी दिसायला लागल्या; मुले व्हिडिओ गेमच खेळताना दिसायला लागले.
पाऊस आला कि कवी-कवयित्री, साहित्यिक, चित्रकार यांच्या विचारांची एक्स्प्रेस धावायला लागते. कोणत्या गोष्टीला कोणत्या 'उपमे'च्या डब्ब्यात टाकतील ते सांगता येत नाही. आपल्या भावना ते शब्दांमधे उतरवण्याचा प्रयत्न करतात; मग ती कविता असो, चित्र असो किंवा एखादा छोटासा लेख. आपल्या विचारांनी निसर्गाचे अनमोल सौन्दर्य त्यांच्याकडून शब्द, लेखणी, कुंचला यांच्याद्वारे कागदावर साकारले जाते. छायाचित्रकार 'युनिक' फोटो शोधत बसतात. ते पावसातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेर्यात कैद करतात. भिजणारी लोक, पावसाचा आनंद लुटणारी लहान मुले, एकाच छ्त्रीत फिरणारी प्रेमी युगुले, पावसाच्या मार्याने पडलेली झाडे अशा विविध विषयातून लोकांसमोर पावसाळा मांडतात.
प्रत्येकाची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आणि
मांडण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी सामान्य लोकांना भुरळ पाडणारी नक्कीच असते.
हिरवाईचं समृद्ध लेणं ल्यायलेली सृष्टी, आकाशातील
इंदधनुष्यामुळे झालेले सप्तरंगी विचार, विविध फुलांनी
सजलेली धरणीमाता अशा विविध उपमांच्या आधारे मानवी जीवन आणि निसर्ग यांचा सहसंबंध जोडला जातो. कोणताही कवी निसर्ग नुसताच अनुभवत नाही किंवा त्यातल्या
सौंदर्याचा आस्वाद घेत नाही तर तो जीवनाच्या व्यापकतेचा शोध घेत असतो.
कवी-कवयित्रीच्या भावना शांता शेळके
यांच्या या कवितेतून दिसतात.....
पावसाळ्याची चाहूल लागली की ट्रेकर्स
ट्रेकिंगसाठी स्थळे शोधायला सुरुवात करतात. ट्रेकर लोक सिंहगड ते सह्याद्रीच्या
सर्व रांगा तसेच छोटी मोठी जंगले, विविध घाट शोधुन शोधुन
फिरत बसतात. पावसाळ्यातला प्रत्येक वीकएन्ड कुठल्या ना कुठल्या तरी गडावर ही मंडळी
साजरा करतात. यातच भर पडते ती प्रेमवीरांची; ट्रेकर्स सारखी ही मंडळी देखील ठिकाणे शोधत बसतात. एकाच छ्त्रीखाली फिरत पावसाचा आनंद घेताना
दिसतात. पावसात एकत्र आईसक्रीम, एखाद्या गडावर मक्याचे
कणीस, खेकडा भजी, सीसीडी मध्ये
गरमागरम कॉफी यांचा आस्वाद घेताना दिसतात. हेल्मेट न
घालता, स्कार्फ न बांधता, रेनकोट
न घालता बाईक ची राईड म्हणजे अफलातूनच!
ऑफिस सुटल्यावर बाईकवरून घरी जाणारी मंडळी पावसात मुद्दामच अमृततुल्यचा अनुभव
घेताना दिसतात; सोबतच असतात गरमागरम भजी, सामोसा, चाट! अशा चहाच्या एका कपाने दिवसभरचे सगळे
टेन्शन पळून जाते. नुसत्या नावाने आणि वासानेच खायची
-प्यायची इच्छा होते.
पावसाळ्यात सगळ्यात जास्त भाव खायला लागतात ती
मंडळी म्हणजे मजनू-देवदास, हृदय तुटलेली,
'तनहा दिल' लोक. जी उगीचच आपल्याला खूप
दुःख झालय आणि या जगात आपल्याला शायरी करण्यापलिकडे काहिच उरला नाहीये अस वागतात.
जसे कि
माझ्यासारखे लोक ...
ये थन्डि हवा, ये हसीन वादिया, याद कर रहे है तुम्हे|
कुणी काही म्हणू, कुणी
काही बोलू, पण प्रत्येक जण पाऊस एन्जॉय करतो तोही
आपापल्या आगळ्या वेगळ्या रंगात आणि ढन्गात!!!
***
रविवार, १६ जून, २०१३
Break up ...
'जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्कील पड जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवाब,
तुमचा मेंदू तुम्हाला फसवतोय? जाणून घ्या विचारांचा 'हाजीर तो वजीर' खेळ!
जे सहज आठवतं तेच खरं असतं का? (हा लेख तुमचे विचार बदलून टाकेल!) कधी कधी तुमच्या बाबतीत असे होते का? सकाळी सकाळी एखादी वाईट बातमी पाहता, अनुभ...
-
खूप दिवसांपासून अमृता-प्रभाकर चे ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर'' नाटक पाहायचे होते पण वेळ मिळत नाही, दूर आहे, पुढच्या...
-
लग्न पहावे (न) करून ऑफिस मध्ये त्या दिवशी ठीक वाटत नव्हते म्हणून दवाख्यान्यात चेक अप करायला गेले. नेहमीप्रमाणे गर्दी भरपूर होती. (ह...
-
फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...






